आग विझवण्याच्या फायरबॉल गोडाऊनला आग,दोन जणांचा होरपळून मृत्यू तर दोन जण जखमी
जामखेड प्रतिनिधी(दि.१३ मे):-अहमदनगर जिल्ह्यातील नगर जामखेड रोडवरील आग विझवण्याच्या फायरबॉल बनवणाऱ्या गोडाऊनमध्ये कामगार काम करत असताना लाईटच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत.ज्ञानेश्वर चंद्रकात भोंडवे व जहीर सत्तार मुलानी हे दोन कामगार काम करत होते तर इतर दोघे गोडाऊनच्या बाजुला थांबलेले असताना अचानक या गोडाऊनला शॉर्टसर्किटमुळे आग लागली.यानंतर जेसीबी च्या सहाय्याने या गोडाऊनला पाठीमागून भगदाड पाडण्यात आले.या नंतर या गोडाऊन मधुन धुराचे मोठे लोळ बाहेर येत होते.तसेच आत मध्ये आसलेल्या फायरबॉलचे आगीमुळे स्फोट होत होते.या स्फोटांच्या अवाजाने आजुबाजूचे लोक धावत बाहेर आले मात्र धुराचा लोळ प्रचंड होता व अधुन मधुन होणारे स्फोट यामुळे कोणासही गोडाऊनमध्ये आत जाता आले नाही.या आगी मध्ये प्रचंड नुकसान झाली.