आष्टी प्रतिनिधी(गोरख निकाळजे):-युथ रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आंबेडकरी विचारांचा वारसदार चळवळीचा सेवक मनोज संसारे यांचे आंबेडकरी चळवळ वाढीसाठी खुप मोठा वाटा होता.महाराष्ट्र असो कि कोणतेही अन्यायग्रस्त गाव असो हा वाघ आपल्या पहाडी आवाजाने भल्या भल्यांची मस्ती जिरवित होता.आपल्या मौलिक सहकार्याने आंबेडकरी कार्यकर्त्यांवरील अन्याय सहज मिटवीत होता.त्यांना भुक नव्हती स्वार्थाची तर मनोज भाईंना आठवण होती बाबासाहेबांच्या प्रचंड त्या त्यागाची.मनोज संसारे अमर रहे मनोज संसारे यांच्या जाण्याने अखंड समाज आज पोरका झाला एका झुंजार वादळाला काळाने हिरावले आहे.मनोज संसारे यांना आदरांजली वाहण्यासाठी आज कडा या ठिकाणी दि. १३ मे रोजी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष दीपक गरुड, किशोर आप्पा घोडके,बंटी घोडके,सचिन जाधव,सचिन साबळे,सागर घोडके,श्रीकांत सोनवणे,सुरेश आण्णा घोडके,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे कार्याध्यक्ष अशोक भाऊ जाधव,आदित्य गरुड,सुमित जाधव,शेखर पवार,विनोद जाधव,नाना खंदारे,कल्याण जाधव,जगदीश कदम,रमेश घोडके सह आदी भिमसैनिकांनी शोकमग्न वातावरणात झुंजार व्यक्तिमत्त्व मनोज संसारे यांना आदरांजली वाहिली व याच ठिकाणी शोकसभेचा कार्यक्रम संपन्न झाला.
