आष्टी प्रतिनिधी (गोरख निकाळजे):-आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील घटना ताजी असतानाच तालुक्यातील देसुर येथे दिनांक ७ मे रोजी सायंकाळी पाच वाजता घटनेतील फिर्यादी कोंडिबा गिरजा कांबळे यांच्या फिर्यादीवरून त्यांचा मुलगा संजय व लक्ष्मण या दोघांच्या मुली यात्रेच्या निमित्ताने गावामध्ये गेल्या असता गावामध्ये त्यांची छेड काढण्यात आली.त्यामुळे त्या घरी रडत आल्या असता संजय हा आरोपीस जाब विचारण्यासाठी गेला असता त्यास आरोपीने दमदाटी करून जातीवाचक शिवीगाळ करून तुला काय करायचे ते करुन घे तुम्हाला घरी येऊन बाया पोरांसहित मारु,त्या दरम्यान संजय घरी आला असता यातील फिर्यादी यांना सर्व हकिकत सांगितली रात्री नऊ वाजता अचानक ज्ञानदेव दिनकर भगत,सुभाष शिवाजी भगत,शिवराज मल्हारी भगत,अभिषेक सुभाष भगत, सुनिल सर्जेराव भगत,लक्ष्मण सुनिल भगत,अनिकेत सुभाष भगत,तुषार अशोक भवर,शरद सुरेश भगत, मल्हारी उत्तम भगत(सर्व रा. देसुर तालुका आष्टी)तसेच दादासाहेब विक्रम पोकळे, संतोष चंद्रकांत पोकळे, एकनाथ पांडुरंग पोकळे, गणेश तुकाराम रेपाटे,सोनाजी अशोक पोकळे,रा.बेलगाव तालुका आष्टी जि.बीड) यांचे विरोधात आष्टी पोलिस ठाण्यात कलम १४३,१४७, १४८,१४९,३२४,२३२,५०४, ५०६ अंतर्गत ॲट्राॅसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच त्यापैकी ज्ञानदेव दिनकर भगत,हा म्हणाला कि तुम्हाला जीवच मारुन टाकतो तुम्ही लय माजलात तुम्हाला गावात राहण्याचा काहीच अधिकार नाही असे म्हणत लाथ मारली मी खाली पडलो त्याने काहितरी धारदार शस्त्राने माझ्या उजव्या मांडीवर मारुन जखमी केले खुप जास्त रक्तस्त्राव झाल्याने माझी मुले भांडण सोडविण्यासाठी आले असता मग माझ्या मुलांनाही खाली पाडले व लाथा बुक्यांनी मारहाण केली.व त्याचबरोबर घरातील अनेक महिला व पुरुषांनाही मारहाण करण्यात आली व जातिवाचक शिवीगाळ करून अतिशय अश्लिल शब्द वापरत आरोपींनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दहशत माजवली.असे होऊन सुद्धा फिर्याद घेण्यास आष्टी पोलिसांनी बराच वेळ टाळाटाळ केली आणि फिर्याद झाल्याच्या नंतर आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली नाही.आरोपी हे मोकाट असुन ते त्यांच्या वरती राजकीय वरदहस्त असल्याने दबाव तंत्राचा वापर करून फिर्याद मागे घेण्याचा वारंवार प्रयत्न करत आहेत.आरोपींवरती कारवाई झाली नाही तर फिर्यादीने उपविभागीय कार्यालयाच्या समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.त्याचबरोबर कुटुंब भयभीत झाले असून त्यांना संरक्षण देण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे व पोलीसांनी कायद्याची बाजु धरुन पिडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करुन आरोपींना पाठीशी न घालता लवकरात लवकर अटक करावे अशी मागणी पीडितानी केली आहे.
