कर्जत प्रतिनिधी (दि.१७ मे):- अहमदनगर जिल्ह्यात होत असलेले बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, स्नेहालय,चाईल्ड लाईन,इतर सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने उडान बालविवाह प्रतिबंधक अभियान ही मोहिम राबविली जात आहे.या अभियान माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी धुमधडाक्यात कारवाई सुरू आहे. बालविवाह होत असल्याची कोणत्याही प्रकारची माहिती चाईल्ड लाईनच्या १०९८ या मोफत क्रमांकावर मिळाल्यास ताबडतोब कोणताही विलंब न करता बेधडक कारवाई केली जात आहे.दिनांक १४ मे रोजी कर्जत तालुक्यातील पाटेगाव या गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह मोठ्या सख्या बहिणीचा लग्नात दिनांक १६ मे २०२३ रोजी महाराजा मंगल कार्यालय कर्जत येथे लावून देणार असल्याची माहिती उडान टीमला मिळाली होती.ही माहिती ताबडतोब कोणताही विलंब न करता स्थानिक यंत्रणांना म्हणजे ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आणि कर्जत पोलीस स्टेशन येथे माहिती देऊन.तो बालविवाह होऊ नये यासाठी चे प्रयत्न सुरू झाले.उडान टीमने मंगल कार्यालयात मालकाशी सोबत संपर्क साधून त्या मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती दिली.त्या मुलीचा बालविवाह लावणार नाही या दृष्टिकोनातून त्यांच्या सोबत चर्चा करण्यात आली.ते स्वतः त्या तालुक्याचे मंगल कार्यालय असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहे.असे त्यांच्या प्रतिसादातून आम्हाला समजले.त्यांना याच बरोबर इतर मंगल कार्यालयाचे मालकांना सुद्धा याबाबत सूचना कशा देता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा ग्रामसेवक व स्थानिक यंत्रणा सोबत बैठक घेऊन काम करावे. याच बरोबर संपूर्ण रद्द होत नाही तोपर्यंत ग्रामसेवक यांना उडान टीमने संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.जर कुटुंबाने लग्न थांबवण्याचे तयारी दर्शवली तर कशाप्रकारे लेखी स्वरूपात जबाब घ्यायचे आहे,कोणकोणते दस्तऐवज एकत्रित करणे आवश्यक आहे,संबंधित लग्न लावणारे व्यवसायिक घटकांना सुद्धा कशाप्रकारे नोटीस द्यायची आहे,त्याचबरोबर बाल कल्याण समिती समोर सादर करण्यासाठीची नोटीस देऊन त्यांना बालकल्याण समिती समोर सादर करण्यासाठी सुद्धा मार्गदर्शन केले आहे. बाल कल्याण समिती समोर सादर करताना कोणकोणते कागदपत्र सोबत घेऊन यायचे आहे.याविषयी सुद्धा मार्गदर्शन केले.कर्जत तालुक्यातील तालुका बाल संरक्षण समितीचे सचिव,बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना सुद्धा या प्रकरणाची माहिती देऊन त्यांना सुद्धा या प्रकारचा हस्तक्षेप करण्यासाठी विनंती केली.सदर मुलीला काळजी आणि संरक्षणाची गरज असल्याने बालकल्याण समितीच्या समोर सादर करणे अनिवार्य आहे.त्यामुळे त्याबाबत सुद्धा मार्गदर्शन करून लवकरच त्या अल्पवयीन मुलीला बालकल्याण समिती समोर सादर करणार आहे.तो बालविवाह पूर्णपणे रद्दबाद करून त्या मुलीला पुन्हा शिक्षणाचा प्रवाहात आणण्यासाठीचा प्रयत्न उडान टीमकडून होणार आहे. हा बालविवाह थांबवण्यासाठी गट विकास अधिकारी श्री.अमोल जाधव,बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. मीटकरी सर आणि उडान टीम चे समन्वयक प्रविण कदम यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक उर्फ बालविवाह प्रतिबंधक अधिकारी श्री. राहुल घोडके,कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री.अनंत सालगुडे,पाटेवाडी गावचे सरपंच उर्फ बाल संरक्षण समिती अध्यक्ष श्री. झुंबर गिरजा राजगुरू, अंगणवाडी सेविका मुजावर पी.वाय.यांच्या संयुक्त कारवाईतून हा बालविवाह थांबवण्यात यश आले. याचबरोबर सर्व नागरिकांना उडान टीम तर्फे आव्हान करण्यात येते की,कुठेही १८ वर्षाच्या आतील मुलीचा आणि २१ वर्षाच्या आतील मुलाचा बालविवाह होताना आढळल्यास किंवा झालेल्या अवस्थेत आढळल्यास ताबडतोब चाईल्ड लाईनच्या मोफत क्रमांक १०९८ वर संपर्क साधून त्या बालिका थांबवण्यासाठीची किंवा त्या बालविवाह पीडित बालकाची सुटका करण्यासाठी माहिती द्यावी.आपले नावाची गोपनीयता पाळली जाईल.
प्रविण कदम
समन्वयक
उडान बालविवाह प्रतिबंधक अभियान, अहमदनगर
