संगमनेर प्रतिनिधी:-मुलीला बोलल्याच्या कारणावरून आईसह तीच्या नातेवाईकांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील पोखरी हवेली येथे सोमवारी (दि.१५) मे रोजी रात्री घडली आहे.तसेच कुऱ्हाडीने वार केले.या हल्यात वडील गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी मुलीच्या आईसह चार जणांविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भीमसेन माधव रुपवते (रा. समनापुर,ता.संगमनेर,ह.रा. पोखरी हवेली,संगमनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश विलास सोनवणे,संतोष संपत साळवे,सविता विलास सोनवणे,सोनल भीमसेन रुपवते (सर्व रा.पोखरी हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भीमसेन रुपवते हे काही कारणावरून आपल्याच मुलीला बोलले होते.त्यामुळे आईसह वरील आरोपींनी सोमवारी (ता.१५ मे) रात्री साडेअकरा वाजता रुपवते यांना शिवीगाळ करत लाथाबुक्याने मारहाण केली.आरोपी महेश विलास सोनवणे याने हातातील कुऱ्हाडीने रुपवते यांच्या डोक्यात डाव्या बाजूला मारत त्यांना गंभीर जखमी केले.तसेच तुला आज जिवंत सोडणार नाही असा दम दिला.अधिक तपास पोलीस करत आहेत.
