
अहमदनगर प्रतिनिधी(दि.१८ मे):-दि.१६ मे रोजी रात्री 01.30 वा.सुमारास सुपा पो.स्टे हद्दीतील रायतळे येथे काही दरोडेखोर आल्याची माहीती रायतळे ग्रामस्थांकडुन सुपा पोस्टे.ला भेटल्याने राञगस्तीवर असणारे सफौ/सुनिल कुटे व पोकॉ/मुसळे यांनी सदर ठिकाणी जावुन गस्त करत असताना रायतळे येथील अर्जुन येणारे यांचे गोठ्यातील 2 लाख किमंतीच्या 4 गाया चोरुन नेल्याची माहीती उपसरपंच श्री.अंकुश रोकडे यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे (18002703600) देण्यात आली.त्यावेळी पोलीसांना काही ग्रामस्थांचा फोन आला की,अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो क्रं एम.एच.16.ए. वाय. 9476 यामध्ये चोरी केलेली जनावरे काही लोक घेवुन जात आहे.अशी माहीती मिळाल्याने पोलीसांनी रायतळे ग्रामस्थांच्या मदतीने सदर वाहनाचा पाठलाग करुन त्यांना मोठ्या शिताफीने पकडले असता त्यांचे कब्जात चोरी केलेले 4 गाया व 2 तलवारी तसेच 1 कोयता मिळुन आला. त्यांचेकडे त्यांचे नाव गावाबाबत माहीती घेतली असता त्यांनी त्यांचे नाव 1)बाबासाहेब जयसिंग काळे वय-22 रा.टाकरवण ता.गेवराई जि.बीड 2) सुरेश यमाजी वाळके रा.लोणी सय्यदमीर ता. आष्टी 3)चाचा पाचा भोसले वय-60 रा.लोणी सय्यदमीर ता.आष्टी असे असुन 2 आरोपी पळुन गेले असुन त्यांचा शोध सुरु आहे.वरिल आरोपी यांचेवर सुपा पो.स्टे 239/2023 भा.द.वि. कलम 395 आर्म अॅक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोसई/पवार हे तपास करत आहे.आरोपी नामे चाचा पाचा भोसले वय 60 रा.लोणी सय्यदमीर ता.आष्टी याचेवर यापुर्वी विविध पोलीस स्टेशनला गंभीर गुन्हे दाखल आहेत.सदरची कामगिरी ही श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक अ.नगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,अजित पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण,श्रीमती ज्योती गडकरी पोलीस निरीक्षक सुपा पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली तसेच रायतळे ग्रामस्थांच्या मदतीने पोसई/पवार,सफौ/सुनिल नारायण कुटे,चापोकॉ/सुरेश मुसळे यांनी केली आहे.