अहमदनगर प्रतिनिधी (दि.१८ मे):-अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील थेरगाव शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेली दोन आरोपी व एक अल्पवयीन यांची टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. त्यांच्याकडून तलवार,लाकडी दांडके,गलोल व मिरचीपूड अशा साधने जप्त करण्यात आली आहे.निकम किंद्राश्या भोसले (वय ३०,रा. मांडवगण,ता.श्रीगोंदा),श्रीनिवास मधु काळे (वय ४५, रा.वाळुंज,ता.नगर) व वाळुंज,ता.नगर येथे राहणारा एक अल्पवयीन मुलगा असे तिघांना ताब्यात घेतले आहे.यातील चार जण फरार झाले आहेत.स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेऊन त्यांचे विरुध्द कारवाई करणेबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आदेश दिले होते.घोगरगाव ते कोंभळी रोडवर, थेरगाव शिवारात,लिंबाचे बागेत ६ ते ७ इसम दरोडा घालण्याच्या तयारीत बसले आहे,अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती.पोलीस पथकाने सदर ठिकाणी पायी चालत बॅटरीचे उजेडात खात्री केली असता,काही इसम अंधारात दबा धरुन बसलेले दिसले.पोलीस पथक आल्याची चाहुल लागताच पळून जाऊ लागले.त्यातील तीन इसमांना ताब्यात घेतले.सदरील आरोपींविरुद्ध मिरजगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 142/2023 भादविक 399,402 सह आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला जिल्हा पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक,श्री. अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग,श्री.दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ/भाऊसाहेब काळे,पोहेकॉ/विजयकुमार वेठेकर,बापूसाहेब फोलाने,अतुल लोटके,देवेंद्र शेलार,रवींद्र कर्डिले,विजय ठोंबरे,बाळू खेडकर,मयूर गायकवाड,बाळासाहेब गुंजाळ,चापोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर यांनी केली आहे.
