लग्न समारंभात जबरी चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
अहमदनगर प्रतिनिधी(दि.२२ मे):-नगर शहरातील लग्न समारंभातून रोख रक्कम व मोबाईलची चोरी करणारी आंतरराज्य टोळी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून या टोळीकडून १ लाख ४४ हजार रुपये किंमतीची मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.याबाबत समजलेली माहिती अशी की,दि.१२ मे २०२३ रोजी बंधनलॉन (जुना वडगांव गुप्ता रोड,अहमदनगर) येथे लग्न समारंभात असताना २ लाख १० हजार रुपये किंमतीची रोख रक्कम व मोबाईल फोन असलेली पर्स चोरी करुन घेऊन गेल्याची फिर्याद यमुना रघुनाथ लांडगे (वय ७५,रा. लांडगे मळा,ता.नगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिली होती.त्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७१८/२०२३ भादविक ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या दाखल गुन्ह्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या.या तपासा दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री.दिनेश आहेर यांना आरोपींची माहिती मिळाली. त्यांनी लागलीच ही माहिती माहिती स्थानिक गणेश शाखेच्या पथकाला दिल्याने, त्यानुसार हे पथक सुपा टोल नाका परिसरात सापळा लावून थांबले असता दिलेल्या माहितीनुसार दुचाकीवर दोनजण येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा इशारा करताच ताब्यातील दुचाकी सोडून पळून जाऊ लागले.पथकाने त्या संशयीतांचा पाठलाग करुन त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतांना त्यांचे नाव गांव सांगितले. त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता,त्यामध्ये ८० हजार रुपये रोख रक्कम व दोन मोबाईल फोन मिळून आले.रोख रकमेबाबत विचारपुस केली असता त्यांनी रक्कम ही अहमदनगर शहरातील नगर मनमाड रोडवरील बंधन लॉन्स येथील लग्न समारंभामध्ये चोरी केली असल्याचे सांगितले.त्याच्याकडे उर्वरित रकमेबाबत विचारपुस केली असता त्यांनी १ लाख रुपये हे वसंत कुमार (पूर्ण नावं माहित नाही रा.कडीयासासी,ता. पचोर,जि.राजगड,मध्यप्रदेश) व कालुसिंह (पूर्ण नांव माहित नाही.रा.लक्ष्मीपुरा राजस्थान) यांच्या बँक खात्यामध्ये पाठविले असल्याचे सांगितले. तसेच गुन्ह्यातील चोरी केलेले मोबाईल हे फेकून दिल्याचे सांगितले.आरोपींकडे त्यांचे इतर साथीदाराबाबत विचारपुस करता त्यांनी गुन्हा करताना साथीदार भुपेद्रसिंह अर्जुनसिंह भानेरीया (कडीयासासी,राज्य मध्यप्रदेश) याच्या सोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. या सर्व आरोपीच्या ताब्यातुन गुन्ह्यात चोरीस गेलेली रोख रक्कम व गुन्ह्यातील निळ्या रंगाची होंडा शाईन दुचाकी व दोन मोबाईल फोन असा एकूण १ लाख ४४ रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेतले.या चोरट्यांना तोफखाना पोलीस ठाण्यात हजर केले आहे.पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील ग्रामीण विभाग,स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव,पोहेकॉ/मनोज गोसावी,दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार,देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले,संतोष खैरे,पोकॉ/रोहित मिसाळ, रणजीत जाधव,आकाश काळे,अमृत आढाव,मेघराज कोल्हे,प्रशांत राठोड,फुरकान शेख,चापोहेकॉ/संभाजी कोतकर यांनी केली केली.