सावित्रीबाई फुले विद्यापीठ संघाने ऑल इंडिया यूनिवर्सिटी रोलबॉल (पुरुष गट) स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२२ मे):-नुकत्याच बंगलौर येथे पार पडलेल्या ऑल इंडिया यूनिवर्सिटी रोलबॉल (पुरुष गट) स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यापीठ संघाने सुवर्ण पदक पटकाविले आहे.या स्पर्धेत एकूण 16 विद्यापीठांनी सहभाग घेतला होता, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुरुष संघाने कडवी झुंज देत सुवर्णपदक मिळविले.सदर संघामध्ये अहमदनगर येथील कु.नीलेश शिंदे,कु.हर्षल घुगे, कु.सार्थक आव्हाड यांनी मोलाची कामगिरी बजावली.भारती विद्यापीठ,पुणे ला क्वार्टर फाइनल सामन्यात 8 गोल ने नमविले.तसेच सेमी फायनल सामन्यात बंगलुरु नॉर्थ यूनिवर्सिटी,बंगलौर 7 गोल ने पंडित दीनदयाळ उपाध्येय शेखावत यूनिवर्सिटी,सीकार, राजस्थानला अंतिम सामन्यात 8 गोलने मागे टाकत सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. कर्णधार अथर्व दायगूडे याच्या नेतृत्वाखाली लेफ्ट आउट बाजूने नीलेश शिंदे याने उपांत्य पूर्व सामन्यात शॉर्ट जंप खेळी करत 1 गोल नोंदविला,हर्षल घुगे व अथर्व आव्हाड यांनी अत्यंत चुरशीने लढत देत संघास नवी उमेद दिली,या पूर्वी ही हर्षल याने सहाव्या विश्व चषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.वरील सर्व खेळाडू अहमदनगर जिल्हा रोलबॉल संघटनेचे खेळाडू असून रोलबॉलचे प्राथमिक धडे श्रीरामपूर तालुका रोलबॉल संघटना सचिव श्री.आनंद पाटेकर,जिल्हा रोलबॉल संघटना सचिव श्री.प्रदीप पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले.आज या विजयाने खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव लौकिक करून संघटनेचे पारने फेडल्याचे संघटनेच्या अध्यक्ष सौ. सविता पाटोळे यांनी सांगितले व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.