Maharashtra247

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी भाऊसाहेब बोठे तर उपसभापतिपदी रभाजी सूळ बिनविरोध

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.२२ मे):-मा.खासदार कै.दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी संचालक भाऊसाहेब बोठे तर उपसभापतिपदी रभाजी सूळ यांची बिनविरोध निवड झाली. सभापती व उपसभापतिपदाच्या दोन्ही जागांसाठी एकमेव अर्ज आल्याने या निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक देविदास घोडेचार यांनी काम पाहिले.नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली.या निवडणुकीत भाजप नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या गटाने सर्व १८ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळविले.या निवडणुकीत नगर तालुका महाविकास आघाडीचे चौथ्यांदा पानिपत झाले.सोमवार दि.२२ मे रोजी नूूतन संचालकांची विशेष झाली.या सभेत सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली.

You cannot copy content of this page