अहमदनगर प्रतिनिधी (दि.२२ मे):- दि.१९ मे रोजी रात्री ०८/४५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी नामे-सुरज सुनिल नायकवाडी वय १७ वर्षे धंदा- शिक्षण,रा.शिंदे गल्ली, माळीवाडा,अहमदनगर हा त्याचा मित्र गणेश शंकर बहीरट याचे सोबत त्यांचे कडील अॅक्सेस मोपेड गाडीवरुन केडगाव येथुन गायकेमळा आगरकर मळ्या मार्गे अहमदनगर शहराकडे येत असताना त्यांचे अॅक्सेस गाडीच्या मागुन एका शाईन मोटार सायकलवरुन दोन अनोळखी इसमांनी येवुन त्यांचे गाडीस धक्का मारुन अपघातात झालेले गाडीचे नुकसान भरुन देतो असे सांगुन त्यांना काही अंतरावर सोबत घेवुन जावुन त्यांचे गळ्याला धारदार कोयता लावुन फिर्यादीच्या हातातील सोन्याच्या दोन अंगठया बळजबरीने काढुन घेवुन तेथुन पळुन गेले आहेत.वगैरे मजकुरच्या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४६५/२०२३ भा.द.वि.कलम ३९२,४२७, २७९,३४ प्रमाणे गुन्हा रजि.दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाचा तपास करत असतांना कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,सदर गुन्हा हा फिर्यादीचे तीन मित्रांनी कटकारस्थान रचुन त्यांनी सदरचा गुन्हा केला आहे.अशी माहिती मिळाल्याने फिर्यादीचे तीनही मित्रांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचापूरस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा कर्ज फेडण्याकरिता केल्याची कबुली देवुन त्यांनी सदर गुन्हयातील मुद्देमाल हा त्यांचा मित्र अभिनव विजय सब्बन रा.सावेडी अहमदनगर याचेकडे विक्री करता दिल्याचे सांगीतल्याने त्याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले असता त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली असून अटक आरोपीची दि. २३/०५/२०२३ रोजी पावतो पोलीस कस्टडी रिमांड असून ताब्यात घेतलेल्या फिर्यादीचे तीनही मित्रांना त्याचे नाव, गाव पत्ता व वय विचारले असता ते विधीसंषर्धीत बालक असल्याचे निष्पन्न झालेले असून सदर गुन्हयात यातील फिर्यादी यांना वरील तिन्ही विधीसंषर्धीत बालकांचे सांगण्यावरुन धारदार शस्त्र कोयता लावून जबरीने लुटणारे आरोपीचे नाव गाव १) मंगेश कांबळे व २) बाबा कावळे दोन्ही रा.केडगांव अहमदनगर असे निष्पन्न झालेले असुन त्यांचा शोध सुरु आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास पोनि/चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोसई/मनोज महाजन हे करीत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे,परि.पोलीस उपाधिक्षक अरुण पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोसई मनोज कचरे,पोसई/ मनोज महाजन,पोहेकॉ/ तनवीर शेख,पोहेकॉ गणेश धोत्रे,पोना/योगेश भिंगारदिवे, पोना/अब्दुलकादर इनामदार, पोना/योगेश खामकर,पोकॉ/संदिप थोरात,पोकॉ/अमोल गाढे,पोकॉ/याकुब सय्यद,पोकों/सुजय हिवाळे,पोकॉ/ कैलास शिरसाठ,पोकॉ/सोमनाथ राऊत,पोकों/सागर मिसाळ,मोबाईल सेलचे नितीन शिंदे यांच्या पथकाने केली आहे.
Trending Topics:
Trending
- एमआयडीसी पोलिसांचा धमाका:हॉटेल ‘गुडलक’ मधील निर्घृण हत्याकांडाचा पर्दाफाश.. तिसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या गुन्ह्याची दिली कबुली..
- नागपंचमीत महिलांचे दागिने लांबवणारी टोळी गजाआड..LCB च्या धाडीत लाखोंचे सोने जप्त..!
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
- गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..
