अहमदनगर (प्रतिनिधी)-नाथपंथी डवरी गोसावी समाज्यातील काही विघ्नसंतोषी लोकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे जात पंचायत होत असल्याची लेखी तक्रार केली होती.ती तक्रार खोटी व समाज्याची बदनामी करणारी असल्याने तक्रारदार मोहन भगवान चव्हाण याच्या विरुद्ध कारवाई व गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी बहुजन रिपब्लिकन नेते अशोक गायकवाड यांचे नेतृत्वाखाली नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने दि.२२ मे रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.दि.4 जुलै 2016 रोजी घोडेगाव ता.नेवासा येथे समाज बाधवांचा राज्यव्यापी मेळावा मा.अशोकभाऊ गायकवाड यांचे उपस्थितीत घेऊन “जात पंचायत “प्रथा बरखास्त करून संविधान व कायदा याचे पालन करण्याचे सर्वानुमते ठरले असतांना समाजातील जेष्ठ व्यक्ती नाथा नारायण बाबर व इतर पाच ते सहा लोकांच्या बद्दल खोटी तक्रार करणारा मोहन चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.याप्रसंगी बहुजन रिपब्लिकन नेते अशोक गायकवाड,युवानेते रवी आल्हाट, सुनील सावंत,नाथा बाबर आदींसह नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
