पाथर्डी प्रतिनिधी (दि.२३ मे):-नातेवाईकांची भांडणे सोडवण्यासाठी मध्ये गेलेल्या महिलेस लाकडी दांड्याने मारहाण करत तीचा खून करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि.22) दुपारी पाथर्डी तालुक्यातील किर्तनवाडी येथे घडली. याप्रकरणी सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुशाला राजेंद्र किर्तने (43,रा. किर्तनवाडी,ता.पाथर्डी) ही महिला मयत झाली आहे.तर शहादेव रामकिसन धायतडक,शुभम शहादेव धायतडक,रणजीत आजिनाथ धायतडक,अक्षय सखाराम धायतडक (रा.धायतडकवाडी, ता.पाथर्डी),संदीप बाळासाहेब शिरसाट (पिंपळगाव टप्पा, ता.पाथर्डी),सोमनाथ गणपत घुले (शेकटे,ता.पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशियीत आरोपींची नावे आहेत.पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे,सहायय्क पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे,कौशल्य रामनिरंजन वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली.पुढील तपास कौश्यल वाघ हे करीत आहेत.
