नगर प्रतिनिधी (दि.२३ मे)-पाईपलाईन रोड,वाणीनगर मधील तागडवस्ती येथील रेणुका भीमा गायकवाडने कष्टकरी आई वडिलांचे स्वप्न जिद्द व चिकाटीच्या जोरावर पूर्ण केले तिची मुंबई पोलीसात निवड झाली.त्यानिमित्त कॉलनीच्या वतीने तिचा व आई वडिलांचा आज सन्मान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी भाजपा साऊथ इंडिया सेल अध्यक्ष वसंतसिंग,रवी शिर्के,मछिंद्र शिपनकर,कचरू ढगे,संजय शिरसाठ,मीरा गायकवाड,हेमा वसंत सिंग,नामदेव जाधव,अशोक जाधव सह कॉलनीतील रहिवाशी,तिचे आई वडील व घरची मंडळी उपस्तिथी होती.एका छोट्याश्या खेड्यामधून तिचे आई वडील उपजीविकेसाठी नगरला आले वडील बिगारी काम व आई परिसरातील घरी धुनी-भांडीचे काम करू लागली घरची परिस्थिती अत्यंत बेताची असताना ही रेणुका गायकवाडने जिद्द धरली पोलीस भरती व्हायचे त्यासाठी तिने दोन वर्षे अभ्यास,सराव केला व त्या बरोबर कॉलेजचे शिक्षण हि घेत आहे सध्या ती बाणेश्वर कॉलेजमध्ये आर्ट च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे.यावेळी बाबुशेठ टायरवाले बोलताना म्हणाले म्हणाले कि वशिलेबाजी होत नाही त्यामुळे आपल्याकडील गरीब युवक युवती मैदानावर मेहनत करून पोलीस मध्ये भरती होत आहे.अहोरात्र अभ्यास करून सरकारी नोकरी करायची आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे हि जिद्द चिकाटी त्यांच्यात दिसत आहे.तिच्या निवडीबद्दल अनेकांनी तिचे अभिनंदन केले.
