
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२४ मे):-तारकपूर बसस्टॅन्ड शेजारील रोडवर हॉटेल थापर्स इन शेजारून जाणाऱ्या रोडवर महाविद्यालयातील युवतींची छेडछाड करणाऱ्या इसमास पकडण्यात निर्भया पथक भरोसा सेलला यश आले आहे.बातमीची हकिकत अशी की,दि.२२ रोजी भरोसा सेल प्रभारी अधिकारी पल्लवी देशमुख यांना राधाबाई काळे महिला महाविदयालयाचे प्राचार्य यांनी फोन करुन एक इसम विदयालयात येणाच्या रस्त्यावर उभा राहुन विदयालयात येणा-या विदयार्थिनींची छेड काढुन त्यांना त्रास देत असले बाबत कळविले.दरम्यान प्रभारी अधिकारी भरोसा सेल व निर्भया पथकातील कर्मचारी यांनी राधाबाई काळे महिला महाविदयालयात जावुन तेथील विदयार्थिनींची भेट घेवुन त्यांचेशी चर्चा करुन घडलेला प्रकार जाणुन घेवुन त्यांना मार्गदर्शन करुन निर्भया पथक व भरोसा सेलचा संपर्क नंबर देवून काही तक्रार असेल तर व पुन्हा तो इसम त्यांना दिसल्यास त्याबाबत कळविण्याबाबत सांगितले.दि.२४ मे रोजी पोलीस अधिक्षक राकेश ओला यांचे आदेशाने तसेच अपर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपअधिक्षक (गृह),पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. अहमदनगर यांच्या सहभागाने भरोसा/निर्भया सेलच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी देशमुख व निर्भया पथकातील अंमलदार पोहेकॉ/बी.बी.पोकळे,चापोना/एस. व्ही.कोळेकर,मपोकॉ/के. एस.खेडकर यांनी हॉटेल थापर्स इन अहमदनगर कडे जाणारा तारकपुर बस स्टॅण्डचे शेजारील रोडवर सकाळी ०७/०० वा.सापळा लावुन थांबले असता ०७/३० ते ०७/४५ वा.चे दरम्यान विदयार्थिनींना त्रास देणारा इसम तेथे आला त्या इसमास सदर विदयार्थिनींनी पाहिले व लगेच निर्भया पथकाचे संपर्क क्रमांकावर संपर्क करुन सदर इसम महाविदयालयाचे रोडवर आला असले बाबत कळविल्याने लागलीच प्रभारी अधिकारी भरोसा सेल व निर्भया पथकातील अंमलदार सदर ठिकाणी जावुन विदयार्थिनींनी ओळखलेल्या इसमास ताब्यात घेतले.तक्रार देणाया विदयार्थिनींना हा तोच इसम आहे का? याबाबत विचारणा केली असता त्यांनी हा तोच इसम आहे जो आमची छेड काढुन आम्हाला त्रास देतो असे सांगितल्याने सदर इसमास त्याचे नाव पत्ता बाबत विचारणा केली असता त्याने त्याचे नाव फरहान शौकतअली शेख वय ३६ वर्षे,रा.आलमगीर मदरसा,पाठीमागे,आलमगीर,भिंगार, अहमदनगर असे असलेबाबत सांगितले.सदर इसमास तोफखाना पोलीस स्टेशन येथे घेवुन जावुन त्याचेवर तोफखाना पो.स्टे.Iगु.र्.नं.७६४/२०२३ भा.द.वि.कलम ३५४, ३५४(A), ३५४(D),३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास तोफखाना पो.स्टे.हे करीत आहेत.