Maharashtra247

विरोधीपक्षांच्या एकजुटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची विरोधीपक्षाला अलीबाबा चालीस चोर ची उपमा;देशात एकत्र येऊ पाहणाऱ्या विरोधी पक्षांकडे देशाचे नेतृत्व करणार कोण याबद्दल अहमदनगर मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली शंका व्यक्त

 

अहमदनगर प्रतिनिधी(दि.२६ मे):-राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर होते.त्यांच्या उपस्थितीत शहरातील नियोजित शासकीय विश्रामगृहाचे भूमिपूजन तसेच जिल्हा आढावा बैठक पार पडली,त्यानंतर भाजप पदाधिकारी संपर्क बैठक कोहिनूर मंगल कार्यालयात संपन्न झाली.यावेळी कर्जत जामखेड मतदारसंघा वरून सध्या आ. राम शिंदे यांनी विखे पिता-पुत्रावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती.ती जाहीर नाराजी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपुष्टात आणली व हम सब एक है भाजपा पक्षाच्या नेतृत्वाखालीच सर्वांनी काम करायचे आहे असे कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी व्यक्तव्य केले.विरोधी पक्षांच्या एकजुटीवर आली बाबा आणि चाळीस चोर ची उपमा देत देशातील एकत्र येऊ पाहणाऱ्या विरोधी पक्षांकडे देशाचे नेतृत्व कोण करणार याबद्दलच शंका आणि मतभेद आहेत.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात व तसेच भारताबाहेर जिथे जिथे जातात तिथे त्यांचे स्वागत करण्यासाठी तेथील नागरिक तयारीतच असतात असेही ते यावेळी म्हणाले. 2024 च्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी तयार राहा व त्या दृष्टीने कामाला लागा असेही ते म्हणाले.यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे,आ.राम शिंदे, खासदार सुजय विखे, आ.मोनिका राजळे, आ.बबनराव पाचपुते,मा.मंत्री शिवाजी कर्डिले,शहर जिल्हाध्यक्ष मिलिंद भैय्या गंधे आदी यावेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page