अहमदनगर प्रतिनिधी(दि.२७ मे):-वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साई एंजल्स इंटरनॅशनल स्कूल तवले नगर औरंगाबाद रोड अहमदनगर यांच्यावर अवाजवी फी आकारली तसेच आरटीई चे नियमांचे उल्लंघन केले यासर्व बाबी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती नगर यांचे कडील चौकशी अहवालात म्हटले प्रमाणे स्पष्ट दिसत आहे. म्हणून शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना वारंवार निवेदन देऊनही व पाठपुरावा करून देखील संबंधितांवर कारवाई होत नव्हती,त्यामुळे वंचित बहुजन आघाडी अहमदनगरचे जिल्हा महासचिव योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या दालनात २६ मे रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी योगेश साठे जिल्हा महासचिव, अरविंद सोनटक्के जिल्हा उपाध्यक्ष,फिरोज पठाण जिल्हा संघटक,भाऊ साळवे शहर जिल्हा सचिव,प्रवीण ओरे शहर जिल्हा उपाध्यक्ष,मनोज कर्डिले शहर जिल्हा संघटक जे.डी.शिरसाठ भिंगार शहर अध्यक्ष,गणेश राऊत,देविदास भालेराव,हे उपस्थित होते. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी सुभाष कराळे सहायक प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग यांनी आंदोलन कर्त्यांशी संवाद साधून साई एंजल्स इंटरनॅशनल स्कूल तवले नगर औरंगाबाद रोड अहमदनगर या खासगी शाळेच्या अध्यक्ष,सचिव,मुख्याध्यापक आणि संबंधित शाळा प्रशासन यांच्यावर दि.६ जून २०२३ रोजी गट शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग नगर यांच्या चौकशी अहवाला नुसार शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या वतीने करण्यात येणार आहे.अश्या आशयाचे तक्रारदार योगेश साठे यांना लेखीपत्र देण्यात आले म्हणून ठिय्या आंदोलनाला स्थगित करण्यात आले आहे.यावेळी जिल्हा संघटक फिरोज पठाण यांनी सांगितले की पालकांची लुबाडणूक करणाऱ्या खासगी शाळा एकच नसून अनेक खासगी शाळा सुरू आहेत त्यावर देखील कारवाई करण्यात यावी.तसेच जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के यांनी म्हणाले की अवाजवी आकरलेली फी पालकांना लवकरात लवकर देण्यात यावे त्याच बरोबर शाळा अध्यक्ष सह शाळा प्रशासन यांच्यावर दंडात्मक कारवाई करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
