अहमदनगर प्रतिनिधी (दि.२७ मे):-जिल्ह्यात रात्रीचे वेळी पेट्रोल पंपावरील डिझेलची चोरी करणारी सराईत आंतरजिल्हा आरोपींची टोळी 15,26,320 रुपये किमतीच्या 280 लिटर डिझेल व ट्रकसह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. घटनेतील सविस्तर माहिती अशी की,फिर्यादी मनोज पितांबर झांबरे(वय 35 रा. संगमनेर) यांच्या मालकीच्या कासारे तालुका संगमनेर येथे साई बालाजी पेट्रोल पंपावरील नाईट ड्युटीवर असलेले कर्मचारी केबिनमध्ये झोपलेले असताना अनोळखी आरोपींनी फिर्यादीचे पेट्रोल पंपावरील 3,52,330 रुपये किमतीचे 3,780 लिटर डिझेल चोरी करून घेऊन गेले होते या घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.ही चोरीची घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून गुन्ह्याचा तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते.पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे जामखेड,खर्डा व उस्मानाबाद परिसरात फिरून आरोपींची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमी दारा मार्फत माहिती मिळाली की ही ईसम नामे तानाजी काळे राहणार जोगेश्वर वस्ती (तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद) याने त्याच्या साथीदारासह कासारे तालुका संगमनेर येथील पेट्रोल पंपावरील चोरी केलेली डिझेल व वाहतुकीसाठी वापरलेली ट्रक त्याचे राहते घरासमोर लावलेले आहे आत्ता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री.दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास करून पंचांना सोबत घेऊन खात्री करून कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.पथक लागलीच नमूद ठिकाणी जाऊन आरोपीचे वास्तव्यावर माहिती घेऊन घराजवळ जाऊन खात्री केली असता एक विटकरी रंगाचा ट्रक लावलेली दिसला पथक व पंचांची खात्री होताच घरामध्ये हजर असलेल्या इसमास बाहेर बोलून पथकाची ओळख सांगून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव तानाजी अशोक काळे (राहणार जोगेश्वर वस्ती तालुका वाशी,जिल्हा उस्मानाबाद)असे सांगितले त्याच्याकडे घरासमोर लावलेल्या ट्रक बाबत विचारपूस केले असता त्याने सदर ट्रक त्याचा मेहुना मुरलीधर शिंदे याचा असल्याचे सांगितले.सदर ट्रकची पंचां समक्ष झडती घेतली असता त्यामध्ये डिझेल ने भरलेले प्लास्टिकचे ड्रम मिळून आले त्याबाबत विचारपूस करता त्यांनी त्याचे इतर साथीदार नामे ज्ञानेश्वर विनायक शिंदे राहणार जोगेश्वरी वस्ती तालुका वाशी, जिल्हा उस्मानाबाद,पोपट व्यंकट पवार,अर्जुन व्यंकट पवार,आनंद पवार अशांनी मिळून संगमनेर तालुक्यात कसारा येथील पेट्रोल पंपावर चोरी केल्याचे कबुली दिली. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,श्रीमती स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर श्री.संजय सातव,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सापोनि/हेमंत थोरात,विजय विठेकर, संदीप पवार अतुल लोटके रवींद्र कर्डिले फुरकान शेख ज्ञानेश्वर शिंदे मच्छिंद्र बडे मयूर गायकवाड रवींद्र घुंगासे रंजीत जाधव रोहित मिसाळ मेघराज कोल्हे अशोक काळे बाळासाहेब गुंजाळ किशोर शिरसाट अमृत आढाव उमाकांत गावडे यांनी केली आहे.
