अहमदनगर प्रतिनिधी (दि.२७ मे):-स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय निमगाव वाघा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धर्मवीर संभाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय काव्यसंमेलन व होरपळ या पुस्तकाचे प्रकाशन श्री. शिशिरकुमार देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक नगर तालुका पोलीस स्टेशन यांच्या हस्ते अमोलज्योत लॉन नगर-कल्याण रोड येथे संपन्न झाले.या कार्यक्रमाच्या निमित्त श्री शिशिरकुमार देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना त्यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्याबद्दल त्यांना धर्मवीर संभाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.याप्रसंगी सपोनी शिशिरकुमार देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ग्रामीण भागातील युवकांनी जास्तीत जास्त साहित्याकडे व सामाजिक कार्याकडे वळावे व आपल्या ग्रामीण भागाची व मातृभूमीची सेवा करावी असे आव्हान या प्रसंगी केले.यावेळी पै.नाना डोंगरे, बाळासाहेब पवार,बाळासाहेब अमृते,मंदाताई डोंगरे, देविदास बुधवंत,शंकर चव्हाण,बाळासाहेब मंतोडे,प्रतिभा डोंगरे,सुनील कुमार धस,संदीप डोंगरे इत्यादी उपस्थित होते.
