अहमदनगर प्रतिनिधी(दि.३ जुन):-राष्ट्रीय अल्पसंख्यांक शिक्षण संस्था आयोग नवी दिल्ली अध्यक्षां समोर सामाजिक कार्यकर्ते यश शहा यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या विविध मागण्या मांडल्या,दि.२८ मे रोजी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोग शिक्षण संस्था नवी दिल्ली अध्यक्ष नरेंद्र कुमार जैन हे आले होते.त्यानिमित्ताने निवासी जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्हा अल्पसंख्यांक कमिटीची मीटिंग रयत शिक्षण संस्थेत आयोजित केली होती.या मीटिंगमध्ये अल्पसंख्याक समितीचे सदस्य इंजि.यश प्रमोद शहा यांनी महासंघाच्या वतीने अल्पसंख्यांक बांधवांसाठी केले जाणाऱ्या कार्याची माहिती दिली.केंद्र सरकार तर्फे दिली जाणारी शिष्यवृत्तीची उत्पन्न मर्यादा कमी असल्यामुळे अनेक विद्यार्थी यापासून वंचित राहत असल्याची खंत व्यक्त केली व ती मर्यादा आठ लाखांपर्यंत वाढवण्यात यावी अशी आग्रही मागणी यावेळी केली.मौलाना आझाद विकास महामंडळ तर्फे दिली जाणारी कर्ज मर्यादा आठ लाखांपर्यंत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.तसेच शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न व जागृती कार्यक्रम शासनातर्फे घेण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. अल्पसंख्यांक दर्जा मिळण्यासाठी जी किचकट प्रक्रिया आहे ती सुटसुटीत करावी जेणेकरून अनेक शिक्षण संस्था याचा लाभ घेऊ शकतील असे यावेळी मागणी केली.मुख्यत्वे अल्पसंख्यांक प्रमाणपत्र शासनाद्वारे दिले जावे जेणेकरून विविध ठिकाणी होणारे अडवणूक थांबेल व लाभार्थी योजनांचे लाभ सहजरित्या घेऊ शकतील,शेवटी अहमदनगर स्थापना दिन असल्याने अहमदनगर शहराची विशेष माहिती अध्यक्षांना दिली व अध्यक्षांनी ही देखील सर्व अहमदनगर वासियांना याप्रसंगी शुभेच्छा दिल्या.नरेंद्र जैन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की यश शहा यांनी केलेल्या मागण्या या मी नोंद करून घेतल्या आहेत यावर केंद्र शासन स्तरावर आयोगातर्फे सकारात्मक प्रयत्न केले जातील.यश शहा हे कमी वयात अल्पसंख्याकांसाठी उल्लेखनीय काम करत असल्याची प्रशंसा त्यांनी आपल्या भाषणात केली.मीटिंगमध्ये इतर अल्पसंख्यांकाचे समाज प्रतिनिधींनी आपापल्या मागण्या देखील मांडल्या यावेळी मालू,वधवा,वाहब,शेख,लुनिया आदी प्रतिनिधी उपस्थित होते.जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देशमुख,जिल्हा परिषदतर्फे शेळके,शिक्षण विभागातर्फे कडूस पाटील,लाळगे सर,सामान्य प्रशासन,इतर शासकीय अधिकारी तसेच रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व त्यांची टीम उपस्थित होती.जिल्हा प्रशासनाने उपस्थित अल्पसंख्यांक समिती सदस्यांना सर्व सहकार्य करण्याचे यावेळी आश्वासन दिले.
