शिर्डी प्रतिनिधी (दि.३ जुन):-अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी शहरातील पानमळा रस्त्यावरील चिकूच्या बागेत एका अज्ञात महिलेचा खून केलेला मृतदेह आढळून आल्याने शिर्डीसह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.मृत महिलेचा लाल रंगाचा चुडीदार व निळ्या रंगाची लेगीज व पांढरा रंगाची ओढणी नाकात व कानात धातुची रिंग पांढरी स्लिपर असा पेहराव असून या महिलेचा मृतदेह २ जुन रोजी मिळून आला असून या घटनेनंतर शिर्डी परीसरात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे.या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी संदीप मिटके,संजय सातव व पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या पथकाने भेट देऊन घटनास्थळाची पहाणी करून माहिती घेऊन मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.या महिलेचा गळा आवळून खुन झाला असावा व मृतदेहाची ओळख पटु नये यासाठी तिच्या चेहऱ्यावर दगड टाकुन चेहरा छिन्नविछिन्न करण्यात आला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहे.
