अहमदनगर प्रतिनिधी (दि.२ जुन):-गोवंशीय जातीच्या जनावराची कत्तल करण्याच्या उद्देशाने अवैध वाहतुक करणाऱ्या टेम्पोसह एकास पकडण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे.बातमीतील हकीकत अशी की,श्री शिशिरकुमार देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक, नगर तालुका पोलीस स्टेशन यांना गोपनिय बातमी मिळाली की,सोलापूर ते नगर रोडवर सोलापूरच्या दिशेने एक अशोक लेलंड टॅम्पोमध्ये गोवंशीय जातीच्या जनावराची कत्तल करण्यासाठी दाटीवाटीने जनावराची वाहतुक करणार आहे.त्यानुसार श्री.शिशिरकुमार देशमुख यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री/युवराज चव्हाण,पोना/धर्मराज दहिफळे,पोकॉ/कमलेश पाथरुट,पोकॉ/संदीप जाधव व चासफौ/दिनकर घोरपडे यांना तोंडी आदेश दिला की, सदर अवैध गोवंशीय जातीच्या जनावराची कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतुक करण्याच्या टॅम्पोवर वाळुंज बायपास चौक येथे जावून कारवाई करा,त्यानुसार सदर आधिकारी व अंमलदार हे वाळुंज बायपास येथे जावून सापळा लावून थांबले असता एक सोलापूरच्या दिशेने नगरकडे नमुद बातमीतील आशोक लेलंड टॅम्पो येताना दिसला पोलीस आणि पंचाची खात्री पटताचा चालकाला रोडच्या बाजूला लेलंड टॅम्पो घेण्यास सांगितले त्यांनी लेलंड टॅम्पो रोडच्या बाजूला घेतला असता सदर टॅम्पोची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये गोवंशी जातीचे लहान चार जनावरे दाटीवाटीमध्ये डांबून ठेवलेली दिसली सदर टॅम्पो चालकाला ताब्यात घेवून त्यांस त्याचे नाव व गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव शेख अल्तामाश हुसेन वय २० वर्षे रा.सुभेदार गल्ली,व्यापारी मोहला,झेंडीगेट ता.जि.अहमदनगर असे असलेचे सांगितले.व त्याने कळविले की,सदर गोवंशी जातीचे जनावरे हे मी अहमदनगर येथे कत्तल करण्यासाठी घेवून चाललो आहे.सदर पंचासमक्ष लहान मोठे असे चार जनावरे व एक अशोक लेलंड टॅम्पो अस एकुण २,०४,५००/मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व त्यातील गोवंशी जातीचे जनावर हे पांजरापोळ,अरणगाव येथे जमा करण्यात आलेले आहे.सदर घटनेबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे,अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण श्री.संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिसांनी केली आहे.
