संगमनेर प्रतिनिधी(दि.६ जुन):-जागेच्या वादातून दोन कुटुंबामध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना दि.५ जुन रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास संगमनेर शहरातील माधव थेटर जवळ घडली असून या हाणामारी पाच जण जखमी झाले आहेत.पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.शहरातील माधव थेटर जवळ राहणार्या दोन कुटुंबामध्ये जागेचा जुना वाद आहे.त्यावरून बरेच दिवसापासून त्याच्यामध्ये भांडणे चालु आहेत.काल रात्री त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला, या वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले.या हाणामारी राहुल रावसाहेब थोरात,मिराबाई विनायक साठे,नितिन विनायक साठे, ओम नितिन साठे,हिराबाई रावसाहेब थोरात हे जखमी झाले.याबाबत राहुल रावसाहेब थोरात यांनी या फिर्यादीवरून पोलिसांनी भाऊसाहेब रंगनाथ आव्हाड, दिलीप रंगनाथ आव्हाड, करण भाऊसाहेब आव्हाड, अर्जुन भाऊसाहेब आव्हाड, कविता दिलीप आव्हाड, लक्ष्मीबाई रंगनाथ आव्हाड, रंगनाथ गंगाधर आव्हाड, सविता भाऊसाहेब आव्हाड यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 440/2024 भारतीय दंड संहिता कलम 143,14, 148,324,323,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
