अहमदनगर प्रतिनिधी(दि.५ जुन):- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केल्याचा राग मनात ठेवून नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावांमध्ये अक्षय भालेराव या बौद्ध तरुणांची जातीयवादी गावगुंडांद्वारे निर्दयीपणे हत्या करण्यात आली.या क्रूर हत्याकांड घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरातील जिल्ह्यातील सर्व भीमसैनिकाच्या वतीने दि.५ जुन रोजी टिळकरोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात या संदर्भात बैठक झाली.व सर्वानुमते अक्षय भालेराव या भीमसैनिकाला न्याय मिळावा यासाठी भव्य जण आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्वांनी उपस्थित राहून विराट भिमशक्तीच दर्शन घडवून घडवून मोर्चात सहभागी व्हावे असे आंबेडकरी चळवळीतील बैठकीतील नेत्यांनी व तसेच कार्यकर्त्यांनी आवाहन केले आहे.हा मोर्चा १३ जुन 10.30 वाजता अहमदनगर महानगरपालिका ते अहमदनगर जिल्हाकार्यालय येथे मोठ्या संख्येने धडकणार आहे.
