अहमदनगर प्रतिनिधी(दि.५ जुन):-शहरातील माळीवाडा वेस येथील महात्मा जोतिबा फुले यांचा व मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ब्राँझच्या धातूनी बनवावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची होती.या मागणीची दखल महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी घेतलीय.ब्राँझच्या पुतळ्याची निविदा नुकतीच मंजूर झाली असून मनपा आयुक्तांनी यास मान्यता दिली आहे.निविदा मंजूर झाल्याने फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या लढ्याला मोठे यश आले आहे.सर्व आंबेडकरी चळवळीच्या वतीने मनपा प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.व लवकरात लवकर मनपा प्रशासनाने महात्मा ज्योतिबा फुले व तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ब्रांझ धातूचे पुतळे उभे करून नागरिकांसाठी एक आदर्श निर्माण करावा अशी शहरवासीयांतर्फे मुख्य मागणी होती ती आता कुठेतरी पूर्णत्वाला आलेली आहे.


