कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई गावठी कटटा व तीन जिवंत काडतुसे बाळगणारा केला जेरबंद
अहमदनगर प्रतिनिधी (दि.५ जुन):-दिनांक ०४ जुन रोजी रात्री कोतवाली पोलीसांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,बुथ हॉस्पीटल परिसर, अहमदनगर येथे एका इसमाच्या कंबरेला गावटी पिस्तोल लावलेले असुन तो तेथे संशयितरित्या उभा आहे. आत्ता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने पोनि/चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी जावुन प्राप्त बातमी मिळाल्याप्रमाणे खात्री करुन कारवाई करणेस सांगीतल्याने सदर ठिकाणी जावून खात्री करता तेथे एक इसम हा बातमीतील हकीगती प्रमाणे संशयितरित्या फिरतांना दिसला.त्याची पोलीस अंमलदारांनी खात्री करुन त्यास सुरक्षितरित्या ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेला उजव्या बाजुला एक काळया रंगाचे लोखंडी अग्नीशस्त्र (गावठी पिस्तोल) व त्याचे मॅग्झीनमध्ये तीन जिवंत काडतुसे असे एकुन ३२,१००/-रु किंमतीचा मुददेमाल मिळुन आल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव दत्तात्रय शामराव काळे वय ४१ वर्षे रा.लोखंडी फॉलजवळ, लनेवासा ते श्रीरामपुर जाणारारोड, बेलपिंपळगांव ता.नेवासा जि. अहमदनगर) असे असल्याचे सांगीतल्याने त्याबाबत पोकॉ/ संदिप हेमंत थोरात यांच्या फिर्यादीवरुन सदर इसमाचे विरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५८६ / २०२३ शस्त्र अधिनियम ३/२५ प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोनि/चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोसई गजेंद्र इंगळे हे करीत आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/चंद्रशेखर यादव, पोसई/मनोज कचरे,पोसई/ गजेंद्र इंगळे,पोलीस/अंमलदार तनवीर शेख,गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे,रियाज इनामदार,योगेश खामकर, सलीम शेख,अभय कदम, संदिप थोरात,अमोल गाढे, सुजय हिवाळे,कैलास शिरसाठ,सोमनाथ राऊत, सागर मिसाळ,अतुल काजळे, सतिष शिंदे यांनी केली आहे.