अहमदनगर प्रतिनिधी(दि.६ जुन):-साईभक्त भाविकांना फायद्यासाठी वेठीस धरणाऱ्या 11 तरुणावर गुन्हा दाखल करून कारवाई शिर्डी पोलिसांनी शिर्डी येथे येणाऱ्या साईभक्तांना ही कारवाई करून मोठा दिलासा दिला आहे.यावेळी शिर्डी पोलीस स्टेशनचे निरीक्षक नंदकुमार दुधाळ म्हणाले की जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने इथून पुढेही कडक कारवाई सुरू राहील.साईभक्त भाविकांच्या माथी बळजबरीने साईमंदिर येथे हार,प्रसाद,फुल,शाल आदी घेण्यासाठी पाठपुरावा करताना त्याच बरोबर हार प्रसाद शाल नेण्यासाठी साईबाबा संस्थाने प्रतिबंधित केलेल्या असताना सर्व काही माहिती असतानाही आपल्या आर्थिक फायद्यासाठी व दुकान चालकाच्या सहमतीतून शिर्डी शहरात साईबाबा मंदिर परिसर पॉलिसी व्यवसाय करून साई भक्ताची फसवणूक करणाऱ्या 11 जणांच्या विरोधात शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी एक जून पासून विशेष पोलीस पथकाच्या माध्यमातून मोहीम सुरू केली आहे.या तरुणांच्या विरोधात सलग तीन दिवसात 11 तरुणाच्या विरोधात भादवीक 341 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यात शिक्षा म्हणून दंड व कारवास यात अदभृत असल्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी सांगितले.शिर्डी शहरात पॉलिसी व्यवसायाच्या माध्यमातून देशभरातून आलेल्या साई भक्ताची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होती.तशा स्वरूपाच्या तक्रारी देखील वेळोवेळी पोलिसाकडे आलेल्या आहेत त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सूचना देऊन कारवाईचे आदेश दिले होते.अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली या व्यवसायात सुरू असलेल्या फसवणुकीपासून साईभक्त भाविकांची सुटका करण्यासाठी धडक कारवाई १ जून ते ४ जून अशा ४ दिवसात साईबाबा संस्थानाच्या गेट क्रमांक १ परिसरात साध्या वेशातील पोलीस पथक फिरत असताना त्यांना वेगवेगळ्या वेळेत तीन दिवसात एकूण 11 जण मिळून आले हे सर्वजण साई भक्ताची फसवणूक करण्यासाठी वाहन अडवणे आमच्या दुकानावर हार प्रसाद घ्या साईबाबाची समाजाचे झटपट दर्शन करून देतो असे सांगून रस्ता आढळून आपल्या आर्थिक फायद्यासाठी लाभळीच्या इरादांनी साईभक्त भाविकांना वेठीस धरत असल्याचे पुढे आले त्यामुळे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या पथकातील कर्मचारी महिला पोलिस सुलोचना गंवादे व पोलीस कॉन्स्टेबल विशाल प्रकाश मैड यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी १ ) लनितीन विश्वनाथ कापसे वय ३० शिर्डी, २)कृष्णा संभाजी पारखे वय २३ साकुरी ता राहता, ३) रविंद्र भास्कर खरात रूई वय २९, ४) सुभाष अंद्रेश गायकवाड वय २७ शिर्डी, ५) एमडी ताजुद्दीन शेख वय ३५ शिर्डी, ६) शाम विष्णू पवार वय २० कर्जत, ७) आरीफ नबीब शहा वय २७ शिर्डी ८) एकनाथ रामभाऊ वायकर वय ३४ पिंपळवाडी, ९) अंजय छबुराव इंगळे वय ३३ पिपळवाडी शिर्डी, १०) जम्मान रशिक शहा वय ३३ पिपळवाडी शिर्डी, ११ ) शुभम संभाजी ससे वय २२ रा नेवासा अशा ११ तरुणांच्या विरोधात भादवी ३४१नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ व कर्मचाऱ्यांनी केली.
