नगर प्रतिनिधी(दि.९ जुन):-माझी वसुंधरा अंतर्गत मिळणारऱ्या पारितोषक रकमेतून संपूर्ण शहरामधे वृक्ष लागवड़,वृक्ष संवर्धनकरून अ.नगरच्या वसुंधरेची सेवा मोहिम राबवावे अशी मागणी तुलसीराम पालीवाल वृक्ष प्राधिकरण सदस्य व पर्यावरण दूत,अहमदनगर महानगर पालिका अहमदनगर यांनी आयुक्त,अहमदनगर महानगरपालिका व जिल्हाधिकारी,अहमदनगर यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सर्वोत्तम कामगीरी व राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून देणारे महानगर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी वर्गाचे प्रथमतः हार्दीक अभिनंदन करतो.अ.नगर शहर हे वृक्ष लागवड़,वृक्ष आणी पर्यावरण बाबत उपेक्षित राहिले आहे आस पासच्या शहरापेक्षा अनगर मधे झाड़ांची संख्या फार कमी आहे या मुळे पावसाचे प्रमाण ही कमी होते या साठी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत मिळणारऱ्या पारितोषक रकमेचा उपयोग अहमदनगर महानगरपालिकाचे इतर विकास कामा करिता केल्यास पुन्हा अहमदनगर शहर निसर्गापासून वंचित राहील यासाठी या पारितोषिक रक्कमेतील जास्तित जास्त रक्कम वृक्ष लागवड़ व वृक्ष संवर्धन करिता खर्च करावी व आयुक्त साहेब यांनी स्वतः व्यक्तिगत लक्ष घालून या कामा मधे भ्रष्टाचार होणार नाही याची दक्षता घेऊन आलेल्या प्रत्येक रुपया मधून शहरा मधील वसुंधरेची सेवा करावी आणी पर्यावरण आणी प्रदूषणाचा समतोल राखण्याची उपाययोजना करण्यात यावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तुलसीराम पालीवाल यांनी केले आहे.
