अहमदनगर प्रतिनिधी (दि.८ जुन):-अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून व गंगापुर संभाजीनगर येथुन बुलेट व ट्रॅक्टरची चोरी करणारा आरोपी ६,५०,०००/- रुपये किंमतीची बुलेट मोटार सायकल व ट्रॅक्टरसह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.घटनेतील हकिगत अशी फिर्यादी श्री.आकाश भाऊसाहेब कडलग (वय ३५, रा.जानकीराम बंगला,नविन नगर रोड,ता.संगमनेर) यांनी दि.३० मे २०२३ रोजी त्यांची रॉयल इनफिल्ड कंपनीची लाल रंगाची बुलेट मोटार सायकल क्र.एमएच /१७/सीएफ/७७११ ही घरासमोर लावलेली असताना अनोळखी आरोपींनी १,५०,०००/- रुपये किंमतीची बुलेट मोटार सायकल चोरुन नेली होती.या बाबत फिर्यादी यांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारी वरुन संगमनेर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.४४२/२०२३ भादविक ३७९ प्रमाणे मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी श्री. दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांना मोटार सायकल चोरीचे ना उघड गुन्हे उघडकीस आणणे करीता पथक नेमुण समांतर तपास करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/ बापुसाहेब फोलाणे,देवेंद्र शेलार,पोना/रविंद्र कर्डीले, संतोष लोढे,फुरकान शेख, संतोष खैरे,पोकॉ/जालिंदर माने,अमृत आढाव,किशोर शिरसाठ,बाळासाहेब खेडकर अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन मोटार सायकल चोरी करणारे आरोपींची माहिती घेवून कारवाई करणेबाबत सुचना देवून पथकास तात्काळ रवाना केले.पथक नेवासा परिसर फिरुन आरोपींची माहिती घेत असताना पोनि/श्री.दिनेश आहेर स्थागुशा यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,इसम नामे किरण गर्ने रा. चिलेखनवाडी,ता.नेवासा याने साथीदारासह चोरी केलेली बुलेट मोटार सायकल व स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर घराजवळ लावलेला आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन पंचाना सोबत घेवुन बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करून कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.पथक तात्काळ चिलेखनवाडी येथे जावुन संशयीत इसम नामे किरण गर्ने याचे वास्तव्या बाबत माहिती घेवुन घरा जवळ सापळा लावुन थांबलेले असताना घराबाहेर बातमीतील वर्णना प्रमाणे एक इसम उभा असलेला दिसला त्यास शिताफीने ताब्यात घेवून पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्यांचे नाव १)किरण अंबादास गर्जे,वय २४,रा.चिलेखनवाडी,ता. नेवासा,जिल्हा.अहमदनगर असे असल्याचे सांगितले.संशयीताकडे घरासमोर लावलेली बुलेट ट्रॅक्टर व त्यांची कागदपत्रे याबाबत विचारपुस करता त्याने त्याचे साथीदार नामे २)सोमा ऊर्फ वैभव सुरोडे रा.मातकुळी,ता.आष्टी,जिल्हा बीड (फरार) ३)महेश सोनवणे,रा.नॉर्दन बँच, श्रीरामपूर (फरार) व ४) अद्द शेख रा.जामखेड (फरार) अशांनी मिळुन संगमनेर परिसरातुन बुलेट,ट्रॅक्टर तसेच गंगापुर, जिल्हा संभाजीनगर येथुन एक ट्रॅक्टर अशा वेगवेगळ्या ठिकाणांवरुन चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपीस अधिक विश्वासात घेवुन आणखी कोठे कोठे व किती ठिकाणी चोरीचे गुन्हे केले याबाबत विचारपुस करता आरोपीने संगमनेर व गंगापुर येथुन ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली दिली.ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे संगमनेर येथुन चोरीस गेलेल्या ट्रॅक्टर बाबत विचारपुस करता त्याने त्याचा साथीदार नामे सोमा ऊर्फ वैभव बाबासाहेब सुरोडे हा घेवुन गेला आहे अशी माहिती दिल्याने आरोपींचे कब्जातुन १,५०,०००/- रुपये किंमतीची बुलेट मोटार सायकल व ५,००,०००/- रुपये किंमतीचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर असा एकुण ६,५०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपींना संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.पुढील कायदेशिर कारवाई संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.आरोपीचे इतर फरार साथीदारांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाहीत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्रीमती.स्वाती भोर अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर व श्री.सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी,संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
