अहमदनगर प्रतिनिधी(दि.९ जुन):-शहरातील एका तरुणीच्या सुरु असलेल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात बळजबरी घुसून मोबाईल मध्ये त्या तरुणीचे चोरून फोटो व व्हिडीओ चित्रीकरण करणाऱ्या दोघा तरुणांना हटकल्याने त्यांनी तरुणीच्या आईला व भावाला धक्काबुक्की करत तुमच्या मुलीवर रेप करू अशी धमकी दिल्याची घटना बुधवारी दि.७ जुन रोजी रात्री १०.३० च्या सुमारास सावेडी उपनगरात घडली.सिराज अलीम काझी व आवेश तैमुद्दिन काझी (दोघे रा.जुना मंगळवार,नगर) अशी या दोघा आरोपींची नावे आहेत.या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाण्यात दोघा आरोपीं विरुद्ध भादंविक ३५४ (अ),(ड),३२३,५०४,५०९ प्रमाणे गुन्हा दाखल केला.अधिक तपास सपोनि/जुबेर मुजावर करत आहे.
