अहमदनगर प्रतिनिधी(दि.९ जून):-लग्नाचे आमिष दाखवून महीलेवर वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलीसांनी जेरबंद केले आहे.दि.०९ जुन रोजी रात्री ०९/२६ वाजण्याच्या सुमारास पिडीत महिला राहणार केडगाव यांनी फिर्याद दिली की,दि.०५/०३/२०२१ रोजी पासुन त्यांची आरोपी नामे सोहेल उबेद पठाण(वय २२ वर्ष रा.वाळकी बसस्टैन्ड मागे, ता.जि.अहमदनगर) याचे सोबत ओळख झाली होती व त्यानंतर त्याने मी तुझ्या सोबत लग्न करतो असे म्हणून दि.०८/०३/२०२१ रोजी पासुन ते सन २०२२ पावेतो तिच्या सोबत जेके कॅफे, प्रेमदान चौक,अ.नगर, हॉटेलचे पाठीमागे,कल्याण रोड व साईनगर आरणगाव, येथे वारंवार तिला लग्नाचे अमिश दाखवून तिच्या सोबत शारीरीक संबंध करुन तिला गर्भवती केले व ती ३ महीन्यांची गर्भवती असतांना तिला बळजबरीने गर्भनिरोधकच्या गोळ्या खावु घालून तिचा गर्भपात केला व त्यानंतर देखील त्याने तिला तिच्या सोबत लग्न करतो असे अमिष दाखवून वेळोवेळी तिच्या इच्छे विरुध्द जबरी संभोग करून तिला पुन्हा गर्भवती केले व तिचे सोबत लग्न करण्यास नकार देवून तिला शिवीगाळ करुन तु हे पोटातले खाली कर नाहीतर तुला जिवे मारुन टाकीन अशी धमकी दिला असुन आरोपीने माझे इच्छे विरुद्ध वेळोवेळी केलेल्या शारीरीक संबंधामुळे मी आरोपी याचे पासुन गर्भवती राहून दि.२४/०१/२०२३ रोजी देशपांडे हॉस्पीटल येथे एका मुलीला जन्म दिलेला आहे.महिलेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.५९७ /२०२३ भा.द.वि. कलम ३७६ (२) (एन), ३१३, ३२८, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे दि.०९/०६/२०२३ रोजी ०९/२६ वा.गुन्हा रजि.दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हा दाखल होताचा सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून कोतवाली पोलीसांनी सदर गुन्हयातील आरोपी नामे सोहेल उबेद पठाण यास वाळकी येथून ताब्यात घेवून त्याच्याकडे सदर गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली असल्याने सदर आरोपीस तात्काळ पोलीस ठाणे येथे आणुन अटक केली असून सदर आरोपीस आज दि.०९/०६/२०२३ रोजी न्यायालय येथे रिमांडकामी रिमांड रिपोर्टसह हजर केले असता सदर आरोपीची पोलीस तपासकामी न्यायालयाने दि.१४/०६/२०२३ रोजी पावेतो ५ दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई/मनोज महाजन हे करत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/चंद्रशेखर यादव, सपोनि/रविंद्र पिंगळे,पोसई/ मनोज महाजन,पोहेकॉ तनवीर शेख,पोहेकॉ/गणेश धोत्रे,पोना/योगेश भिंगारदिवे, पोना/अब्दुल कादर इनामदार,पोना/योगेश खामकर,संदिप थोरात, अमोल गाढे,याकुब सय्यद, सुजय हिवाळे,कैलास शिरसाठ,सोमनाथ राऊत,सागर मिसाळ, मपोकाँ/पुजा दिख्खत यांनी पथकाने केली आहे.
