अहमदनगर प्रतिनिधी (दि.१० जुन):-श्रीरामपूर येथील श्री. साजिद छोटू शहा व त्याचा भाऊ तन्वीर शहा याने सुनील देवकर यांच्या पत्नी विषयी अपशब्द वापरला होता. अपशब्द वापरल्याचा राग मनात धरून सुनील देवकर याने त्यांच्यावर चोपरणे वार करत जीवे ठार मारले. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये गुरन 553/2023 भादविक 302,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी श्री.दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून होण्याचा समांतर तपास करून फरार आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक माहिती घेत असताना सुनील देवकर हा रेल्वेने कुठेतरी पळून जाणार असल्याची माहिती तपास करत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच पथकाने रेल्वे स्टेशन परिसरात प्रवासी म्हणून वेषांतर करून सापळा लावला व सुनील देवकर रेल्वे पळून जाण्यासाठी रेल्वे स्थानकात येताच वेषांतर करून थांबलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून पकडले घटनेच्या चोवीस तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखा आणि श्रीरामपूर शहर पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.सदरील कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक/दिनेश आहेर,श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव,सफौ/ भाऊसाहेब काळे,पोहेकॉ/विजयकुमार वेठेकर,अतुल लोटके,देवेंद्र शेलार,पोना/ रविंद्र कर्डीले,संतोष लोढे, बाळासाहेब गुंजाळ,गणेश भिंगारदे,फुरकान शेख, पोकॉ/रणजीत जाधव,किशोर शिरसाठ,गणेश भिंगारदे,मेघराज कोल्हे,प्रशांत राठोड व चापोहेकॉ/बबन बेरड आदींनी केली आहे.
