अहमदनगर प्रतिनिधी (दि.१३ जुन):-नांदेड जिल्ह्यातील बोंढार इथे अक्षय भालेराव या मागासवर्गीय तरुणाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो म्हणून करण्यात आली होती.या घटनेच्या निषेध म्हणून आज 13 जून रोजी अहमदनगर शहरात आंबेडकरवादी जनतेने जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते.हा मोर्चा सकाळी 11 वाजता अहमदनगर महानगरपालिका येथून निघून छत्रपती संभाजीनगर रोडने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आहे.यावेळी मोठ्या संख्येने भीमसैनिक महिलावर्ग या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले.अक्षय भालेराव या तरुणाची निर्घृण हत्या करून समाजकंटकांनी मागासवर्गीय समाजाच्या वस्तीवर दगडफेकही केली.या घटनेचे पडसाद नगर जिल्ह्यात देखील उमटले या हत्याकांडातील सर्व आरोपींवर कडक कारवाई करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी व्हावी,तसेच आरोपींना कठोरातील कठोर शासन व्हावे,व पीडितांच्या घरच्यांना 50 लाख रुपयांची मदत राज्य सरकारने करावी अशी मुख्य मागणी घेऊन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मयत तरुण अक्षय भालेराव याला श्रद्धांजली वाहून या मोर्चाची सांगता करण्यात आली.

