अहमदनगर प्रतिनिधी (दि.१३ जुन):-नगर तालुका पोलिसांनी नेप्ती,निमगाव वाघा,खंडाळा गावाच्या शिवारामध्ये एकाच दिवशी पाच ठिकाणच्या गावठी हातभट्टीवर धडक कारवाई करत एकुण 6,32,000/ रुपयांचा मुद्देमाल जागीच नाश केला आहे.घटनेतील हकीकत अशी की पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी श्री.शिशिरकुमार देशमुख सहायक पोलीस निरीक्षक नगर ता.पोस्टे यांना नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध गावठी हातभट्टीवर कारवाई करण्यासाठी सहायक पोलीस अधीक्षक श्री.बी.चंद्रकांत रेड्डी यांना सोबत घेवून नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये करावाई करुन गावठी हातभट्टी अड्डे उध्दवस्त करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार श्री.बी.चंद्रकांत रेड्डी सहायक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. शिशिरकुमार देशमखु,सहायक पोलीस निरीक्षक नगर तालुका पोलीस स्टेशन यांनी पोउनि/रणजित मारग, पोउनि/युवराज चव्हाण, पोहेकॉ/शैलेश सरोदे,पोना/सचिन वणवे,राहूल शिंदे,महेश भवर,मपोना/गायत्री धनवडे पोकॉ/कमलेश पाथरुट, संभाजी बारोडे,वैभव काळे,अनिल जाधव,मंगेश खरमाळे व चासफौ/पठाण यांचे अवैध गावठी हातभट्टी धंद्यावर कारवाई करणेकामी पथक तयार केले.त्यानुसार सदर पथकाने नेप्ती, निमगाव वाघा,खंडाळा गावच्या शिवारात जावून विविध पाच ठिकाणी गावठी हातभट्टीवर जावून मोठया प्रमाणात कच्चे रसायण,तयार गावठी हातभट्टी व गावठी हातभट्टी तयार करण्यसाठी लागणारे साहित्य असे एकुण 6,32,000/- मुद्देमाल जागीच नाश करण्यात आला.याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन येथे सदरबाबत वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.संपतराव भोसले,श्री.बी.चंद्रकांत रेड्डी सहायक पोलीस अधीक्षक, नगर तालुका सपोनि/शिशिरकुमार देशमुख व नगर तालुका पोलिसांनी केली आहे.
