अहमदनगर प्रतिनिधी (दि.१३ जुन):-अपहरण करुन खंडणीची मागणी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. घटनेची सविस्तर माहिती अशी की,दि.13 जुन 2023 रोजी फिर्यादी नामे उमा रवि फुलपगार (वय 42 वर्ष,रा.सावेडी अहमदनगर) यांनी फिर्याद दिली की,दिर नामे मधुकर शांताराम फुलपगार यांना आरोपींनी पन्नास लाख रुपये द्या नाहीतर आम्ही जमीनीची खरेदी देणार नाहीत असे म्हणुन बळजबरीने गाडीमध्ये बसुन अपहरण केले होते त्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुरजिनं 519/2023 भादविक 363,384,34 प्रमाणे दाखल झाला करण्यात आला होता.सदर गुन्हयाचा तपास करत असतांना सपोनि/राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,अपहरण झालेल्या व्यक्तीला आरोपी हे स्विप्ट गाडीमध्ये घेवुन दुध डेअरी चौकातुन शेंडी बायपास रोडने पिंपळगाव माळवी बाजुला जात आहेत.अशी माहिती मिळाल्याने लागलीच पोनि/सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन आरोपींवर कारवाई करून पकडण्यास सांगितले.पथकाने आरोपींचा पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले व त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1)सखाराम नानासाहेब बरडे वय 35 वर्ष रा.वांबोरी ता. राहुरी,जि.अहमदनगर 2) पंकज नानासाहेब पाटील उर्फ बेडगे रा.चेतना कॉलनी,नवनागापुर ता.जि. अहमदनगर असे सांगीतले त्यांचा तिसरा साथीदार सुनिल आण्णासाहेब ढोकणे रा.उंबरे,ता.राहुरी.जि. अहमदनगर हा पळून गेला. वरील दोन आरोपींना शिताफिने पकडुन अपहरीत व्यक्ती नामे मधुकर शांताराम फुलपगार यांची सुटका करण्यात आली.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि/ राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन,पोसई/दिपक पाठक,पोसई/राजेंद्र गायकवाड,पोना/विजय नवले,पोना/संदीप चव्हाण, पोना/मिसाळ,पोकॉ/किशोर जाधव,पोकॉ/सचिन हरदास पोकॉ/नवनाथ दहिफळे यांनी केली आहे.
