पाथर्डी प्रतिनिधी(दि.१४ जुन):-पाथर्डी तालुक्यातील वैजू बाभूळगाव येथे दि.१३ जुन रोजी सायंकाळी ७ वा. सुमारास एक खळबळ जनक घटना घडली,यामध्ये फिर्यादी महिलेने आरोपी रोहिदास लक्ष्मण मोरे रा.वैजु बाभूळगाव यास आमच्या शेतातील विहिरीचे पाणी का घेतले अशी विचारणा केली असता आरोपी मोरे याने फिर्यादी महिलेस म्हणाला की तू मला कोण विचारणारी असे म्हणत शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.व मागे दोन ते तीन महिन्यांपूर्वी यातील आरोपी मोरे याने या फिर्यादी महिलेवर अतिप्रसंग करून जातीवाचक शिवीगाळ केली होती पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत फिर्यादी महिलेने गुन्हा दाखल आहे.तू माझ्यावर मागे दाखल केलेला गुन्हा मागे अन्यथा तुला दाखवतो असे म्हणूनही आरोपीने पिडीत महिलेस दम दिला महिलेने पाथर्डी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रोहिदास मोरे याच्या विरुद्ध 323,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
