अहमदनगर प्रतिनिधी (दि.२१ जुन):-गुजरात राज्यातुन एमआयडीसी परीसरात चोरी करण्याचे इरादयाने आलेल्या एका सराईत गुन्हेगारास अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांनी यश आले आहे.याबाबत माहिती अशी की, एमआयडीसीचे पोलीस दि.19 जुन 2023 रात्रगस्त दरम्यान पेट्रोलिंग करीत असतांना शेंडी बायपास रोड शेंडी शिवार येथे एक इसम स्वतःचे अस्तित्व लपवुन एका टपरीचे आडोशाला लपवुन बसलेला दिसला.त्यावेळी पोलीस अंमलदारांना त्याचा संशय आल्याने ते त्यास पकडण्याकरीता त्याचे दिशेने गेलेअसता सदर आरोपी हा पोलीसांना पाहुन पळुन जावु लागला त्यावेळी पोलीस अमंलदारांनी त्याचा पाठलाग करुन त्यास पकडले.व त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने उडवाउडवीची उत्तरे दिली.त्यावेळी त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव आकाशकुमार किरीटभाई पटेल (वय-३० वर्ष रा.कोठयु फल्यु वराड ता.बारदोली जि.सुरत गुजरात)असे सांगीतले.व तो चोरी करण्याचे इरादयाने स्वत:चे अस्तित्व लपवतांना मिळुन आला म्हणुन त्याचे विरुदध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुरजिन/५३३/२०२३ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.हा आरोपी सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर महाराष्ट्र व गुजरात येथे विविध पोलीस स्टेशनमध्ये तब्बल दहा गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन,पोहेकॉ/महमंद शेख,पोहेकॉ गिरवले,पोकॉ/किशोर जाधव,पोकॉ/नवनाथ दहिफळे,पोकॉ/शुभम सुद्रुक यांचे पथकाने केली आहे.
