नगर प्रतिनिधी(दि.२४ जुन):-हातात तलवार घेवून दहशत करण्याऱ्या इसमास नगर तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे.बातमीतील हकीकत अशी की,श्री.शिशिरकुमार देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक,नगर तालुका पोलीस स्टेशन यांनी अवैध शस्त्र बाळगण्यावर,विक्री करण्याऱ्यावर कारवाई करणेसाठी पोउनि/युवराज चव्हाण,पोउनि/रणजित माराग,पोहेकॉ/सुभाष थोरात,पोकॉ/कमलेश पाथरुट, संभाजी बोराडे,राजू खेडकर,विशाल टकले असे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार केले व त्यांना सुचना व मार्गदर्शन केले.त्यानुसार सदर पथकातील अधिकारी व अंमलदार हे नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगण्यावर व विक्री करण्याऱ्यावर कारवाई करणेसाठी पेट्रोलींग करीत असतांना पोउनि/युवराज चव्हाण यांना गुप्त बातमी मिळाली की,सारोळा बध्दी गावच्या शिवारात नगर ते जामखेड रोडवरील विश्वभारती इंजनेरींग कॉलेजच्या पुढे नवीन बायपास ब्रिझच्या खाली एक इसम त्याच्या हातामध्ये तलवार घेऊन थांबलेला आहे.त्यानुसार पथक सारोळा बध्दी गावच्या शिवारामध्ये नगर ते जामखेड रोडवर नवीन झालेल्या ब्रीझच्या खाली जावून पाहणी केली असता तेथे एक इसम हातात तलवार घेवून विक्री करण्याच्या उद्देशाने थांबलेला दिसला पोलीसाची चाहूल लागल्याने तो तेथून पळून जावू लागला परंतु पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले व दोन पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्या हातामध्ये धारदार तलवार मिळून आली त्यास त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अजय जगन्नाथ बेरड(वय 24 वर्षे रा.दरेवाडी ता.जिल्हा अहमदनगर) असे सांगितले त्यास ताब्यात घेवून नगर तालुका पोलीस स्टेशनला येवून त्याचे विरुध्द पोकॉ/कमलेश पाथरुट यांनी फिर्याद दिली आहे.सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे,अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.संपतराव यांचे मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिसांनी केली आहे.
