Maharashtra247

जिल्हा रुग्णालयात ५० खाटाचे क्रिटिकल केअर हॉस्पिटल व लॅबला मंजुरी खा.डॉ.सुजय विखे पाटील

 

अहमदनगर प्रतिनिधी(दि.२४ जुन):-प्रधानमंत्री आयुष्मान भारत इन्फ्रास्ट्रक्चर मिशन या योजने अंतर्गत अहमदनगर जिल्हा रुग्णालयास 50 खाटाचे क्रिटिकल केअर हॉस्पिटल व इंटिग्रेटेड पब्लिक हेल्थ लॅब हे मंजूर झाले असल्याची माहिती खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्यसेवा अधिकाधिक सक्षम करण्यासाठी प्रधान मंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन अंतर्गत 50 खाटाच्या सिसीएच साठी 23 कोटी 75 लाख रुपये तर सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यासाठी आयपिएचएल ह्या लॅब साठी एक कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अत्यावस्थ रुग्णांचा विचार करता 50 खाटाचे सीसीएच हे युनिट लवकरच सुरू होत असून याच बरोबर दुर्धर आजाराचे निदान करण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या विविध रक्त तपासणी साठी अत्याधुनिक लॅब सुरू करण्यात येणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीत ज्या पद्धतीने देश संकटाला सामोरे गेला तशीच परिस्थिती पुन्हा आली तर जिल्हास्तरावर सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात या करिता जिल्हा रुग्णालयात सिसीएच आणि आयपीएचएल सेवा सुरू केली.अहमदनगर जिल्हा रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध व्हावी या करिता सातत्याने याचा पाठपुरावा करून योजना आणली असल्याचे यावेळी खा.विखे पाटील यांनी सांगितले. लवकरच या दोन्हींचे काम सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page