प्रतिनिधी (दि.२५ जुन):-विद्यार्थ्यांना आपल्या ध्येयाची जाणीव होऊन त्या ध्येयाप्रती विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन लेखक स्वप्निल गोरे (यवतमाळ जिल्हा अध्यक्ष भारतीय साहित्य व संस्कृतीक मंच) यांनी केले.अत्यंत तरुण वयात आपल्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर अतिशय मेहनतीने जिद्दीने समाजाच्या हितासाठी विविध क्षेत्रातून कार्य करणारे सावरगाव गोरे पुसद तालुक्यातील यवतमाळ जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व (B.A.Appear) कवी लेखक,लेखक प्रेमी रचनाकार विख्यात साहित्यिक अनेक भाषांवर प्रभुत्व असणारे त्यांचे प्रकाशित साहित्य मनातील कविता या काव्यसंग्रहात कविता प्रकाशित असुन रहस्य प्रेमाचे या काव्यसंग्रहात तीन कविता प्रकाशित आहेत.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत फुलसिंग नाईक महाविद्यालयातील”कल्पना”या वार्षिक अंकास सलग तीन वर्षापासून मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषेत कविता लेख यांचे लिखाण केले आहे.दैनिक सिंहझेप व दैनिक जय गणनायक इत्यादी वृत्तपत्रातून कविता प्रकाशित झाल्या आहेत.तसेच सचिव मराठी भाषा आणि वांग्मय अभ्यास मंडळ अध्यक्ष – समाज विज्ञान अभ्यास मंडळ,विभागीय परीक्षक – परमहंस रामचंद्र जागतिक मराठी साहित्य मंच,ही अनेक पदे त्यांनी भूषविली आहेत व ह्या पदाना ते न्याय देत आहेत.त्यांनी शाळा कॉलेज आणि इतर शैक्षणिक क्षेत्रातील पहिला दिवस म्हणजेच विद्यार्थी आत्मविश्वास दिनाला पाठींबा दिला व विद्यार्थी आत्मविश्वास दिनाने विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होण्यास महत्वपूर्ण हातभार लागेल तसेच ही संकल्पना जगात पहिल्यांदाच मांडणाऱ्या अंकुश रामचंद्र जोष्टे (ठाणे) यांचे कौतुक करताना इंग्लंड मधून सेरा शिक्षिकेने व्हिडिओ ने पाठींबा दिला याचेही कौतुक केले.ह्या संकल्पनेचा आपल्या परीने सर्वांनी प्रचार करून सहकार्य करावे असे आवाहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
