Maharashtra247

कर्मवीर आबासाहेब काकडे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूलच्या परिसरामध्ये १०४ वृक्षांचे केले वृक्षारोपण 

 

 

नगर प्रतिनिधी (दि.२५ जुन):-शहरातील जिल्हा सहकार सभागृह समोरील राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल येथे आज रोजी २५ जून २०२३ रोजी राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल व श्री संत गाडगे महाराज छात्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल या विद्यालयात कॉ.आबासाहेब काकडे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे व शाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे यांच्या शुभ हस्ते विद्यालयाच्या प्रांगणामध्ये १०४ वेगवेगळ्या प्रजातीचे वृक्ष लावून वृक्षरोपण करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष गोरक्षनाथ पुजारी,प्रमुख पाहुणे प्रा.सिताराम काकडे,राष्ट्रीय शिक्षण मंडळ संस्थेच्या अध्यक्षा चंद्रकला पुजारी,उद्योजक रामदास ससे,प्रा.वंदना पुजारी,राष्ट्रीय पाठशाळा प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.शोभा जोशी व श्री संत गाडगे महाराज छात्रलयाचे अधिक्षक बाबासाहेब पातकळ मान्यवर उपस्थित होते.विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले.मान्यवरांचे हस्ते कॉ.आबासाहेब काकडे यांचे प्रतिमांचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष गोरक्षनाथ पुजारी म्हणाले “आबासाहेब काकडे यांच्या रुपाने शेवगाव व पाथर्डी,नगर शहर,कर्जत या भागातील शेतकरी,कष्टकरी व गोरगरीबांच्या कल्याणासाठी नेता तयार झाला.कॉ. आबासाहेब काकडे यांनी वसतिगृहात राहून आपले नगर, पुणे,कोल्हापूर येथे शिक्षण घेतले.त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराज,संत गाडगे महाराज,कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा प्रभाव पडला व त्यांनी वकीलीची पदवी घेतल्यानंतर कॉ.बापूसाहेब भापकर,कॉ.भाई सथ्था यांच्यासोबत कष्टकरी,शेतकरी,कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या वकीलीचा उपयोग केला. शेतक-यांच्या जमिनी सावकारांच्या ताब्यातून सोडवल्या. तसेच आपल्या भागातील शेतक-यांचा विकास करावयाचा असेल तर त्यांच्या शेतीला सिंचनातील पाणी मिळाले. पाहिजे यासाठी त्यांनी संघर्ष केला.ताजनापूर लिफ्ट योजना,कोपरे धरण,मुळेचे पाणी,शेवगाव तालुक्याला मिळावे यासाठी सतत आंदोलने केली व मागणीसाठी पाठपुरावा केला आबासाहेबांनी शेतक-यांच्या,कष्टक-यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वसतिगृह,बालगृह व विद्यालये सुरु केली.शिक्षणाशिवाय कष्टकरी व शेतकरी यांची प्रगती होणार नाही हे त्यांनी जाणले होते व त्यासाठी शेवगाव पाथर्डी भागात शाळा महाविद्यालये सुरु केली. आबासाहेबांनी केलेले कार्य हे दिपस्तंभासारखे आहे.”प्रा. सिताराम काकडे सांगितले की आबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.आबासाहेब यांनी स्थापन केलेल्या संस्थेचा आता वटवृक्ष केला.त्यांचे कार्य पुढे नेटाने चालवण्याचे काम अॅड.डॉ. शिवाजीराव काकडे व अहमदनगर जि.प.माजी सभापती सौ.हर्षदाताई काकडे व संस्थेचे विश्वस्त पृथ्वीसिंह काकडे हे करत कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रा.सौ. वंदना पुजारी यांनी आबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेतला व आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाची प्रगतीबद्दल माहिती दिली.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश काथवटे,संजय सकट,सतीश काळे,बाबासाहेब लोंढे, श्रीमती मनिषा कोळगे,प्रविण उकिर्डे, आबासाहेब बेडके,कविराज बोटे, सुशील ननवरे,संभाजी आठरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी अशोक चव्हाण,विजय वाणी,तुकाराम विघ्ने,राहुल लबडे इत्यादी उपस्थित होते.

You cannot copy content of this page