प्रतिनिधी(दि.२४ जुन):-चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस श्रीरामपूर शहर पोलिसांनी नुकतेच जेरबंद केले आहे.दि.16 जुन 2023 रोजी दरम्यान फिर्यादी निखील रविंद्र सानप(वय 29 वर्षे,धंदा-व्यवसाय,रा.अश्विनी कॉलनी,समर्थनगर,वार्ड नं. 06,श्रीरामपूर) येथील फि. याचे घराचे कुलुप व कडीकोयंडा कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी करण्याचे उद्देशाने तोडला आहे.म्हणुन फिर्यादीचे तक्रारीवरुन दि. 21 जुन 2023 रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं.594/2023 भादंवि 454,380,511 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाचा तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत असताना,तपास पथकाने सदर परिसरातील सी.सी.टी.व्ही.फुटेज तसेच खबऱ्यामार्फत माहिती घेवून सदरचा गुन्हा हा आरोपी नामे तोफिक आयुब पठाण,वय 28 वर्षे,रा.हुसेननगर,वार्ड नं.01, श्रीरामपूर याने त्याचे दोन साथिदारासोबत मिळून केला असल्याचे निष्पण झाल्याने त्याचा शोध घेणे चालू केले. दि.23 जुन 2023 रोजी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना सदर गुन्हयातील आरोपी हा रात्री 08/00 वा. सुमारास फकीरवाडा,वार्ड नं. 01,प्रशासकीय इमारत समोर श्रीरामपूर,परीसरात येणार असल्याची गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाल्याने पोनि.गवळी यांचे आदेशाने सदर परिसरात तपास पथकाने सापळा रचुन शिताफीने सदर आरोपीस ताब्यात घेतले,त्याने नमुद गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली आहे व सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हर्षवर्धन गवळी यांचे कडील तपास पथकातील सपोनि/जिवन बोरसे,पोना/रघुवीर कारखेले, पोना/बी.एच.पंडीत,पोकॉ/ राहुल नरवडे,पोकॉ/गोतम लगड,पोकॉ/रमिझराजा अत्तार,पोकॉ/गणेश गावडे, पोकॉ/मच्छिंद्र कातखडे, पोकॉ/संभाजी खरात यांनी केली असुन सदर गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोना/बी.एच.पंडीत हे करीत आहेत.
