प्रतिनिधी(दि.२४ जुन):-अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात दररोज दुचाकी चोरीच्या घटना घडत असुन चोरी गेलेल्या मोटर सायकल व चोरांचा अजून पर्यंत शहर पोलिसांना तपास लागलेला नाही.तोच आता तर चोरट्यांनी थेट गजबजलेल्या पोलिस वसाहतील असलेल्या रूम मधूनच चक्क दोन दुचाकी चोरून पोलिसांनाच आव्हान दिल्याची घटना गुरुवार (दि.२२) जून रोजी दुपारी घडली आहे.याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,शहरातील पोलिस वसाहतीच्या रूममध्ये बुलेट क्रमांक(एमएच २० ए.९४२३, (एमएच १७ सीए.९८६०) या दोन दुचाकी लावल्या होत्या अज्ञात चोरट्यांनी शासकीय निवासस्थानातून या दोन्ही दुचाकी चोरून पसार झाले आहे.या प्रकरणी महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल अनिता गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक महाले हे करत आहे.दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात दुचाकीच्या दररोज चोऱ्या होत आहे.त्यामुळे नागरिक चांगलेच वैतागले आहेत.आता तर चोरट्यांनी थेट पोलिस वसाहतीच्या रूम मधूनच दुचाकी चोरून पोबारा केल्याने आता सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पोलीस स्टेशनचा चार्ज घेताच एक खमकी भूमिका घ्यायला हवी होती रात्रीची पोलिसांची गस्त वाढवायला पाहिजे होती परंतु तसे झाले नाही याने रात्री शहरात होणाऱ्या चोऱ्याचे प्रमाण अधिक वाढत आहे.जर अशा वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत तर पोलीस करतात तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
