अहमदनगर प्रतिनिधी (दि.२३ जुन):-अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर लैंगीक आत्याचार करणाऱ्या तरुणास नगर तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे.यातील फिर्यादी यांनी दि. २३/३/२०२३ रोजी फिर्याद दिली की,माझी पिडीत मुलगी वय १५ वर्षे ही माझ्या घरी असतांना कोणीतरी आज्ञात इसमांने तिला आमच्या सहमतीशिवाय फुस लावून मोटार सायकलवर घेवून गेला आहे.अशी फिर्याद नगर ता.पोलीस स्टेशन येथे गुरनं २१४/२३ अन्वये गुन्हा फिर्याद देण्यात आली होती.त्या अनुषंगाने पिडीत मुलगी हिचा शोध घेवून तिस ताब्यात घेवून तिला बालकल्याण समिती,अहमदनगर समोर हजर केले व त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर लैंगीक आत्याचार केलेचे समोर आले.त्यानंतर तिचा बालकल्याण समितीने जबाब घेतला असता सदर जबाबामध्ये सुध्दा तिने सांगितले की,मला इसम नामे अनिकेत शहदेव लबडे (रा. भातोडी पारगाव ता.जि. अहमदनगर) याने मला माझ्या राहत्या घरासमोर लग्नाचे आमिष दाखवून मला फुस लावून चांदबीबी महाल येथे घेवून गेला व मला धमकावून माझे इच्छेविरुध्द माझ्याशी लैंगीक आत्याचार केले व मला म्हणाला की,सदरचा झालेला प्रकार जर तु कोणाला सांगितला तर मी तुला व तुझ्या कुंटुबाला संपवून टाकेल अशा प्रकारचा जबाब दिला सदर घटनेतील पिडीत मुलगी ही अनुसुचित जाती जमातीतील असल्याने सदर गुन्ह्यामध्ये अ.जा.व अ.ज.अतर्गत वाढीव कलम लावण्यात आलेले आहे.त्यानुसार श्री शिशिरकुमार देशमूख, सहायक पोलीस निरीक्षक,नगर तालुका पोलीस स्टेशन यांनी सदरची घटनेचे गार्भीय लक्ष्यात घेवून सदर आरोपीचा शोध घेणेकामी एक पथक तयार केले व त्यांना सदर आरोपी पकडण्यासाठी योग्य त्या सुचना व मार्गदर्शन केले. त्यानुसार पथक हे सदर आरोपीचा शोध घेणेकामी पेट्रोलींग करीत असतांना सपोनि श्री.शिशिरकुमार देशमुख यांना गुप्त बातमी मिळाली की,आरोपी नामे अनिकेत लबडे हा त्याच्या भातोडी पारगाव येथील राहते घरी आलेला आहे व तो लगेच परत जाणार आहे अशी बातमी मिळाल्याने सपोनि शिशिरकुमार देशमुख यांनी सदर पथकास सांगितले की, आरोपी नामे अनिकेत लबडे हा भातोडी पारगाव येथील त्याच्या राहत्या घरी आलेला आहे तात्काळ जावून त्यास ताब्यात घ्या अशा सुचना दिल्याने सदर पथक भातोडी पारगाव येथे जावून सदर आरोपीच्या राहत्या घरी जावून शोध घेत असताना तो घराच्या पाठीमागच्या दरवाज्यातून पळून जात असतांना त्यास मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले व त्यास त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अनिकेत शहदेव लबडे रा.भातोडी पारगाव ता.जि. अहमदनगर असे सांगितले सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवून पोलीस स्टेशन आणले.सदर गुन्ह्याचा तपास पोउनि/रणजित मारग हे करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री/संपतराव भोसले,सपोनि/शिशिरकुमार देशमुख,पोउनि/रणजित मारग,पोउनि/युवराज चव्हाण,पोकॉ/विशाल टकले,पोकॉ/कमलेश पाथरुट,संभाजी बारोडे यांनी केलेली आहे.
