अहमदनगर प्रतिनिधी (दि.२३ जुन):-भारतीय सैन्य दलात इंटेलिजन्स विभागात (RAW) अधिकारी असल्याचे भासवुन बनावट ओळखपत्र,चिन्ह व कागदपत्रे अवैधरित्या बाळगणारा तोतया सैन्य अधिकाऱ्याला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.दि. २२ जुन २०२३ रोजी श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक,अहमदनगर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की नगर शहरातील सावेडी येथील प्रोफेसर कॉलनी चौक समर्थ शाळे जवळ एक लाल रंगाचा टी शर्ट,निळे रंगाची जिन्स पॅन्ट घातलेला व सॅक असलेला इसम भारतीय सैन्य दलात, इंटेलिजन्स विभागात (RAW) अधिकारी असल्याचे भासवुन बनावट ओळखपत्र, चिन्ह व कागदपत्रे वापरत आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने अहमदनगर जिल्हा तसेच लगतचा औरंगाबाद व पुणे जिल्हा सैन्य दलाचे दृष्टीने अतिशय महत्वाचे व संवेदनशिल ठिकाणे असल्याने अशा प्रकारे कोणी सैन्य दलातील इंटेलिजन्स विभागाचे बनावट ओळखपत्राचा वापर करुन संबंधीत सैन्य विभागाचे प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करुन अनुचित प्रकार किंवा घातपात करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.वरील प्रमाणे घटना निदर्शनास आल्यानंतर श्री. राकेश ओला साहेब पोलीस अधिक्षक यांनी सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन पोनि / श्री.दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना सदन कमान मिलेट्री इंटेलिजेन्स विभाग पुणे येथील अधिकारी व पंचाना बरोबर घेवुन नमुद बातमीतील संशयीत इसमाची खात्री करुन कायदेशिर कारवाई करणे बाबत आदेश दिले.नमुद आदेशा प्रमाणे पोनि/ श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करुन यांना कारवाई करणे बाबत नियोजन करुन मार्गदर्शन केले.पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दि.२२ जुन रोजी बातमीतील नमुद ठिकाणी प्रोफेसर कॉलनी चौक,सावेडी येथील समर्थ शाळे जवळ जावुन वेशांतर करुन सापळा लावुन थांबलेले असताना एक लाल रंगाचा टी शर्ट,निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेला व सॅक घेतलेला इसम दिसला. पथकाची खात्री होवुन संशयीतास पकडण्याचे तयारीत असताना त्यास पोलीस पथकाची चाहुल लागताच तो पळुन जावु लागला.लागलीच पथकाने संशयीताचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव १)संतोष आत्माराम राठोड(वय ३५,रा.दिवटे,ता.शेवगांव, जिल्हा अहमदनगर) असे सांगितले.त्यास सैन्यदलामध्ये कोठे नोकरीस आहे अशी विचारणा केली असता त्याने इंटेलिजन्स विभागात (RAW) अधिकारी म्हणुन नोकरीस असल्याचे सांगितले व तसे ओळखपत्र दाखविले.संशयीत इसमाने हजर केलेले ओळखपत्र व कागदपत्रांची पथकातील पोलीस अधिकारी व मिलिट्री इंटेलिजन्स अधिकारी यांनी पडताळणी करता सदर कागदपत्रे ही बनावट असल्याची खात्री झाल्याने त्यांचेकडे अधिक विचारपुस करता त्याने मी सैन्य दलात अधिकारी असल्याचे भासवुन नोकरीचे आमिष दाखविण्यासाठी ओळखपत्र व कागदपत्रे तयार केल्याची माहिती दिली. ताब्यातील संशयीत इसमा बाबत सदन कमान मिलेट्री इंटेलिजेन्स,पुणे पथकाचे अधिकारी यांनी त्यांचे विभागात चौकशी करुन खात्री केली असता नमुद इसम हा कोठेही सैन्यदलात सेवेत नसल्याची माहिती दिल्याने त्याची पंचा समक्ष अंगझडती घेता त्याचे अंगझडतीत स्वतःचा फोटो, राजमुद्रा असलेले ओळखपत्र, आधारकार्ड,निवडणुक आयोगाचे ओळखपत्र, इतर बनावट कागदपत्रे व विवो कंपनीचा मोबाईल फोन असा १०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल कब्जात मिळुन आल्याने त्याचे विरुध्द पोना/ सचिन दत्तात्रय अडबल ने.स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. ९०८/२०२३ भादविक ४६५,४६८,१७०,१७१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे,स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/ तुषार धाकराव,पोहेकॉ/अतुल लोटके,देवेंद्र शेलार,पोना/रविंद्र कर्डीले,पोना/सचिन आडबल,विजय ठोंबरे,संतोष खैरे,पोकॉ/आकाश काळे व अमृत आढाव तसेच सदन कमान मिलिट्री इंटेलिजेन्स, पुणे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
