शेवगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी गजाआड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२५ जुन):-शेवगांव येथील आडत व्यापारी व त्यांची भाऊजयीचा चोरीच्या उद्देशाने खुन करणारा सराईत आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
बातमीची हकिगत अशी की,शुक्रवार दि.२३ जुन रोजी पहाटे ०४.०० वा.चे सुमारास फिर्यादी श्रीमती. सुनिता गोपीकिसन बलदवा (वय ४८,रा. मारवाडगल्ली, ता. शेवगांव) यांचे घराचा वरच्या मजल्यावरील लाकडी दरवाजा अनोळखी इसमाने उघडुन आत प्रवेश करुन चोरीच्या उद्देशाने फिर्यादी यांचे पती गोपीकिशन गंगाबिसन बलदवा यांना व जाऊबाई श्रीमती पुष्पा हरीकिसन बलदवा वय ६० अशा दोघांना कशाने तरी डोक्यात मारुन,जिवे ठार मारले.तसेच फिर्यादी यांना लोखंडी कटावणी व विटेने मारहाण व जखमी करुन ४,९५,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख चोरुन नेली होती.सदर घटने बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं.५५२/२०२३ भादविक ३०२,३९७,३०७,४६० प्रमाणे खुनासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन श्री.बी.जी. शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र,नाशिक यांनी घटनेची माहिती घेवुन श्री. राकेश ओला पोलीस अधिक्षक यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुण सदर गुन्हा उघडकीस आणणे करीता आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुन्ह्याचा समांतर तपास करणे करीता तीन वेगवेगळी पथके तयार केली.एका पथकाने शेवगांव,शहरातील सीसीटीव्ही फुटेजचे आधारे आरोपीचा माग घेणे तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पडताळणी करत होते.दोन पथके लगतचे बीड व पैठण,जिल्हा छत्रपती संभाजीनगर परिसरातील संशयीत तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडे तपास करुन गुन्हा उघडकीस आणणे कामी प्रयत्न करत होते.नमुद सुचने प्रमाणे अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/गणेश वारुळे,हेमंत थोरात,पोहेकॉ/सुनिल चव्हाण,दत्तात्रय हिंगडे,अतुल लोटके,विजय वेठेकर,दत्तात्रय गव्हाणे,बापुसाहेब फोलाणे,देवेंद्र शेलार,पोना/रविंद्र कर्डीले,ज्ञानेश्वर शिंदे,संतोष लोढे,संदीप दरदंले,संदीप चव्हाण,फुरकान शेख,रविंद्र घुगांसे,अमृत आढाव,बाळासाहेब खेडकर,जालिंदर माने,शिवाजी ढाकणे,किशोर शिरसाठ,प्रशांत राठोड,संदीप पवार,चापोहेकॉ/संभाजी कोतकर,उमाकांत गावडे, चापोना/भरत बुधवंत व चापोकों/अरुण मोरे तसेच शेवगांव पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोकों/बाप्पा धाकतोडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करुन आरोपींचा शोध घेवून कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथके रवाना केले पथके शेवगांव परिसरात फिरुन घटना ठिकाणचे व आजु बाजूचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन त्या आधारे आरोपीचे वर्णन,आरोपीचे चालण्याची पध्दत (बॉडीलँग्वेज) व त्याने घातलेले कपडे व गुन्हा करण्याची पध्दत या आधारे तीन आरोपींवर लक्ष केंद्रीत केले होते.दरम्यान अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा कडुन माहिती मिळाली की,सीसीटीव्ही फुटेज मधील आरोपी हा खेडकर चव्हाण (रा.बिडकीन, ता.पैठण,जिल्हा संभाजीनगर) हा असुन तो त्यांचे गांवी आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी तात्काळ प्राप्त माहिती पथकास कळवुन पंचाना सोबत घेवुन तसेच स्थानिक पोलीसांची मदत घेवुन संशयीत आरोपीचे गावी म्हारोळा,बिडकीन,ता.पैठण येथे पाठवुन आरोपीचे ठावठिकाणाबाबत खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथकाने बिडकीन,ता.पैठण येथे जावून पोहेकॉ/वाल्मिक निकम, स्थागुशा,छत्रपती संभाजीनगर (ग्रा) यांना मदतीस घेवुन संशयीत आरोपीची माहिती घेतली असता सदरचा संशयीत आरोपी हा म्हारोळा, बिडकीन,ता.पैठण येथे गांवात फिरताना मिळुन आला त्यास शिताफीने ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या इसमास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव १)खेडकर टाबर चव्हाण, वय.३२,रा.म्हारोळा, बिडकीन,ता.पैठण,जिल्हा औरंगाबाद असे असल्याचे सांगितले.त्याचे कडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने टाटा एस.गाडीमध्ये येवुन गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास शेवगांव पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीकक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक, व श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव विभाग तसेच श्री.रेड्डी परिविक्षाधिन सहाय्यक पोलीस अधिक्षक शेवगाव,यांचे सुचना व मार्गदर्शना खाली पोनि/श्री.दिनेश आहेर,स्थानिक गुन्हे शाखा व पोनि/विलास पुजारी साहेब व सपोनि/पावरा ने. शेवगांव पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.