पाच गोवंशीय जनावरांची कोतवाली पोलिसांनी केली सुटका कोतवाली पोलिसांची रात्रीचे पेट्रोलिंग दरम्यान कारवाई दोन लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त
अहमदनगर प्रतिनिधी(दि.२५ जुन):-कोतवाली पोलिसांचे पथक पेट्रोलिंगवर असताना शनिवारी रात्री (दि.२४) गोवंशीय जनावरांचा टेम्पो पकडला आहे.कत्तलीसाठी जात असलेल्या पाच गोवंशीय जनावरांची कोतवाली पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे.
या कारवाईत दोन लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, व्यापारी मोहल्ल्यातील कुरेशी मज्जिद समोर कत्तल करण्याकरिता गोवंशीय जनावरे आणलेली आहेत.पोलीस निरीक्षक यादव यांनी पेट्रोलिंगवर असलेल्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.पथकाने कुरेशी मज्जिद जवळ जाऊन (एम.एच १२ एन.एक्स ९४२६) बोलेरो वाहनाची झडती घेतली.वाहनामध्ये पाच गोवंशीय जनावरे मिळून आल्याने पोलिसांनी वाहन जप्त केले.तसेच,वाहन चालक गौस शेर मोहम्मद कुरेशी (वय ४०वर्ष, रा. नालबंद खुंट, झेंडीगेट,अहमदनगर) याला ताब्यात घेवून चौकशी केली असता जनावरे तौसिफ सादिक कुरेशी (रा.झेंडीगेट) याच्या मालकीची असल्याचे सांगितले.कोतवाली पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियम सन १९५५ चे कलम ५ (ब), ९ सह प्राणी क्लेश प्रतिबंध अधिनियम सन १९६० चे कलम ११ प्रमाणे दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सलीम शेख करीत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे,यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक/चंद्रशेखर यादव,पोहेकॉ/ तनवीर शेख,पोना/योगेश भिंगारदिवे,पोना/सलिम शेख, पोकॉ/अभय कदम,पोकाँ/कैलास शिरसाठ,पोकों/सुजय हिवाळे,पोकॉ/संदिप थोरात,पोकॉ/अमोल गाढे,पोकाँ/सागर मिसाळ,पोकों/अतुल काजळे यांच्या पथकाने केली आहे.