अहमदनगर प्रतिनिधी (दि.२८ जुन):-आगामी बकरी ईद व आषाढी एकादशी उत्सवानिमित्त अहमदनगर शहरात कायदा व सुव्यवस्था राखणे करीता ३५ गुंड प्रवृत्तीच्या इसमांना श्री.सुधीर पाटील (उपविभागीय दंडाधिकारी नगर भाग, अहमदनगर) यांचे कडे प्रस्ताव पाठवून त्यांनी फौजदारी प्रक्रीया संहीता कलम 144 (2) प्रमाणे अहमदनगर शहर व नगर तालुका हद्दीतून ३५ गुन्हेगार यांना दि.२८ जुन रोजीचे 00/001 ते दि.30/06/2023 रोजीचे 20/00 वा.पर्यंत हद्दपार केले बाबतचे आदेश पारीत केले आहेत.फौजदारी प्रक्रीया संहीता कलम 107 प्रमाणे 20 आरोपींवर कारवाई केली असून फौजदारी प्रक्रीया संहीता कलम 149 प्रमाणे 25 इसमांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत.कॅम्प पोस्टे हद्दमधील 02 दारू विक्रेत्यां विरूद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 93 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शना खाली भिंगार कॅम्प पोस्टेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे,सफो/कैलास सोनार,पोहेकाँ/गोविंद गोल्हार,पोहेकाँ/संदिप घोडके,पोहेकाँ/शफीकस शेख,पोना/दिपक शिंदे,पोना/राहुल द्वारके अशांनी केली आहे.
