नगर प्रतिनिधी(दि.३० जुन):-पंढरपुरचा पांडूरंग हा अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे.आषाढी एकादशीनिमित्त वारकरी पंढरपुरच्या पांडूरंगाच्या दर्शनासाठी जातात.हा उत्सव आप आपल्या भागातील विठ्ठल-रुख्मिणी मोठ्या उत्साहात साजरा करतात.रेल्वे स्टेशन परिसरातील आराध्या प्रतिष्ठानच्यावतीने नागरिकांना आषाढी एकादशीनिमित्त प्रसाद देण्याचा उपक्रम कौतुकास्पद असाच आहे. प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक कार्यात आपला सहभाग देत समाजोन्नत्तीचे काम करत आहे,असे प्रतिपादन उद्योजक भगवान खैरे यांनी केले.सालाबादप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त आराध्या प्रतिष्ठानच्यावतीने नागरिकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी उद्योजक भगवान खैरे,प्रतिष्ठानचे मयुर (बालीशेठ) बांगरे, दत्ता खैरे,संभाजी पवार,संदेश इंगळे, दादा पेटारे,सुरज आक्से,सचिन पवार,अजय शिंदे,पंडित खुडे,अन्सार शेख,बंटी खैरे,आकाश निरभवणे,निलेश बांगरे,योगेश इंगळे आदि उपस्थित होते.याप्रसंगी संभाजी पवार म्हणाले,आराध्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेले उपक्रम समाजाभिमुख असतात.त्याचा नागरिकांना चांगल्या पद्धतीने फायदा होत असल्याने अनेक कामे मार्गी लागत आहेत. आजचा प्रसादाचा उपक्रमाने नागरिकांना पांडूरंगाचा प्रसादच मिळाला असल्याचे सांगितले.यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाली बांगरे म्हणाले,सालाबाद प्रमाणे यंदाही आराध्या प्रतिष्ठानच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त प्रसादाचे वाटप केले आहे. नागरिकांच्या गरजा ओळखून त्यादृष्टीने प्रतिष्ठान कार्यरत आहे. महिला, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रतिष्ठानचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. राष्ट्रीय पुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, सण-समारंभात सामाजिक दायित्व जपत उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रसादाचा रेल्वे स्टेशन परिसरातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला. शेवटी निलेश बांगरे यांनी सर्वांचे आभार मानले.
