अहमदनगर प्रतिनिधी (दि.३० जुन):-संगमनेर येथील सराफाच्या डोळ्यात मिरचीपुड टाकुन लुटणारी टोळी सोन्या चांदीचे दागिने, गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.दि.26 जुन रोजी फिर्यादी श्री.प्रसाद पंडीतराव नांदुरकर (वय 50,धंदा सराफ,रा.निमगांवजाळी,ता.संगमनेर) हे त्यांचे सराफ दुकानातील सोन्या चांदीचे दागिने पिशवीमध्ये भरुन दुकान बंद करुन घरी जाताना पल्सर मोटार सायकलवर आलेल्या अनोळखी दोन इसमांची फिर्यादीचे डोळ्यात मिरचीपुड टाकुन मारहाण करुन 7,62,125/- रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने बळजबरीने चोरुन नेले होते.या घटने बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन आश्वी पोलीस स्टेशन गु.र.नं. 157/2023 भादविक 394, 34 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.ही घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर,स्थागुशा यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेवासा,सोनई परिसरात फिरुन आरोपींची माहिती घेत असताना पोनि/श्री.दिनेश आहेर स्थागुशा यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,काही इसम पांढरे रंगाचे स्कॉर्पिओ गाडीमधुन संगमनेर येथील सराफाचे डोळ्यात मिरचीपुड टाकुन चोरी केलेले सोन्याचांदीचे दागिने, गावठीकट्टा व जिवंत काडतुस विक्री करण्यासाठी नेवासा फाटा येथे येणार आहे.आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाली. पोनि/श्री.आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.पथकाने लागलीच नेवासा फाटा,ता. नेवासा येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना थोडाच वेळात नेवासा ते नेवासा फाटा रोडने एक पांढरे रंगाची स्कॉर्पिओ येताना दिसली.पथकाची खात्री होताच स्कॉर्पिओ चालकास हात दाखवुन थांबण्याचा इशारा केला.सदर स्कॉर्पिओ चालकास संशय आल्याने त्याने ताब्यातील स्कॉर्पिओ भरधाव वेगात अहमदनगरचे दिशेने घेवुन जावु लागला. पथकाने स्कॉर्पिओचा पाठलाग चालु केला व सदर स्कॉर्पिओ गाडी सुरेशनगर, त्रिवेणीश्वर कमानी जवळ, नेवासा फाटा,ता.नेवासा येथे आडवुन गाडीतील संशयीत इसमांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीत इसमांना पोलीस पथक व पंचाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1)खंडेश्वर रमेश ठोंबळ,वय 23,रा.आंत्रे, शहरटाकळी,ता.शेवगांव, 2) आकाश बाळासाहेब चौधरी, वय 23,रा.रांजणगांव,ता. शेवगांव व 3)प्रमोद रावसाहेब गायकवाड,वय 33,रा. मुसळेवस्ती,लोणी,ता.राहाता मुळ रा.पढेगांव,ता.श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले. त्यांची व स्कॉर्पिओ गाडीची पंचासमक्ष झडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये एक गावठी बनावटीचा कट्टा व तीन जिवंत काडतुस व स्कॉर्पिओ गाडीचे झडतीमध्ये काळे रंगाचे बॅगेत विविध प्रकारचे सोन्याचे व चांदीचे दागिने मिळुन आले.पोना/185 ज्ञानेश्वर नामदेव शिंदे,ने. स्थानिक गुन्हे शाखा यांचे फिर्यादी वरुन नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. 724/2023 आर्म ऍ़क्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.ही कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्रीमती.स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/सोपान गोरे,मनोहर शेजवळ,पोहेकॉ/मनोहर गोसावी,दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार,पोना/रविंद्र कर्डीले,पोना/सचिन आडबल, विशाल दळवी,संतोष खैरे,पोना/ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख,पोकॉ/शिवाजी ढाकणे,मेघराज कोल्हे,अमृत आढाव व प्रशांत राठोड यांनी केली आहे.
